Love Story : ज्यानं अ‍ॅसिड फेकलं, त्याच्याबरोबरच ‘तिने’ थाटला संसार | पुढारी

Love Story : ज्यानं अ‍ॅसिड फेकलं, त्याच्याबरोबरच 'तिने' थाटला संसार

पुढारी ऑनलाईन डेस्क : एका तरुणाने आपल्या मैत्रीण असणाऱ्या तरुणीवर अ‍ॅसिड फेकले. त्या तरुणीचा चेहरा पूर्ण जळला. या घटनेत तिला केवळ ३० टक्के दिसू लागलं. तरीही या मुलीने त्या तरुणाबरोबर आई-वडिलांना न सांगता पळून जाऊन लग्न केलं आणि त्याच्याबरोबर संसार थाटला. सोशल मीडियावरून या नातेसंबंधांवर दोन्ही बाजूने प्रतिक्रिया येत आहेत. (Love Story)

खरंतर ही घटना आहे, तुर्की येथील. यासंदर्भात न्यूयाॅर्क पोस्टने वृत्त दिले आहे. त्या वृत्तानुसार तरुणीचं नाव आहे बेरफिन ओजेक आणि तरुणाचं नाव आहे कासिम ओजन सेल्टी. २०१९ मध्ये कासिमने बेफरिनच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकलं होतं. त्यावेळी हे दोघे जण रिलेशनशीपमध्ये होते. काही कारणांवरून त्यांच्यात वाद झाला होता. हा वाद टोकाला गेला आणि रागाच्या भरात कासिमने बेफरिनच्या चेहऱ्या अ‍ॅसिड फेकलं. या प्रकरणात कासिमला तुरुंगवासही भोगावा लागला.

दरम्यानच्या काळात कासिम तुरुंगांतून बाहेर आला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कासिमने बेफरिनची माफी मागितली आणि केलेल्या कृत्याला पश्चाताप होत आहे, असं सांगितलं. त्यानंतर बेफरिनने कासिमवरचे सर्व खटले मागे घेतले. अ‍ॅसिड हल्याचे प्रकरणही मिटवून टाकले. बेफरिनने स्वतः सांगितलं की, या प्रकरणानंतर सर्व काही नष्ट झाले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. (Love Story)याच काळात दोघे जण एकत्र राहू लागले.

कासिमने बेफरिनसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि तिने तो स्वीकारला. त्यानंतर लग्नाची तारीख फिक्स करण्यात आली . नुकतंच त्‍यांनी लग्न केले. पण, या लग्नाने बेफरिनचे वडील आनंदी नाहीत. ते म्हणाले की, “बेफरिनने आम्हाला न सांगता लग्न केले आहे. तिला न्‍याय मिळावा म्‍हणून कित्येक वर्षं लढत राहिलो; पण आता ते सर्व व्यर्थ गेले.”

या  प्रेम प्रकरणावर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांना बेफरिनचा निर्णय योग्य वाटत आहे, तर काही जणांना तिचा हा निर्णय चुकीचा वाटत आहे. काही जणांना असं वाटतंय की, बेफरिनचा निर्णय हा तिचा वैयक्तिक आयुष्यातील आहे. त्यावर कुणालाही बोलण्याचा अधिकार येत नाही.

हेही वाचलंत का? 

Back to top button