

पुढारी ऑनलाईन डेस्क :
ओबीसी आरक्षणासंदर्भात मध्य प्रदेश पॅटर्न राज्यातही राबवावे, अशी मागणी आज सकाळी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आली. ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज संस्था निवडणुका स्थगित करावी, या निर्णयावर सर्वपक्षीय बेठकीत एकमत झालं. यासंदर्भातील ठराव विधानसभेत मांडण्यात यावा, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
ओबीसी राजकीय आरक्षणावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. याप्रश्नी आज सर्वपक्षीय बैठक झाली. ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्यातही मध्य प्रदेश पॅटर्नचा वापर करा, अशी सूचना यावेळी करण्यात आली. ओबीसी आरक्षणावर निर्णय होईपर्यंत या निवडणुका स्थगित ठेवण्यात याव्यात, यावर एकमत झाले. आता यासंदर्भातील ठराव विधानसभेत मांडण्यात येणार आहे.
ओबीसी आरक्षण तिढा न सुटल्याने मध्य प्रदेश सरकारने ग्रामपंचायत आणि पंचायत समिती निवडणुका रद्द करण्याचा निर्णय रविवारी घेतला होता. सुप्रीम कोर्टाने १७ डिसेंबर रोजी निर्णय देताना ओबीसी आरक्षणाला स्थगिती देताना मागासवर्गीय जागांबाबत पुन्हा आरक्षणाचे नोटिफिकेशन काढण्याचे निर्देश दिले हाेते. त्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप होत होते. अखेर मध्य प्रदेश सरकारने या निवडणुकाच रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे काँग्रेसने स्वागत केले. आता महाराष्ट्रातही असाच निर्णय घ्यावा, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांमध्ये एकमत झालं आहे.
हेही वाचलं का?