Yorkshire Ripper : १३ वेश्यांची हत्या केली अन् मेला कोरोनाने | पुढारी

Yorkshire Ripper : १३ वेश्यांची हत्या केली अन् मेला कोरोनाने

पुढारी ऑनलाईन डेस्क : तो (Yorkshire Ripper) चोरीची चारचाकी घ्यायचा… त्याला बवानट नंबरप्लेट लावायचा… गाडीच्या डिग्गीत मोठी रस्सी, हातोडा आणि धारदार चाकू घेऊन कुंटनखान्यात जायचा… तिथल्या वेश्या महिलांना गाडीत बसवायचा आणि एका निर्जनस्थळी घेऊन त्यांच्या डोक्यात मागच्या बाजूने हातोडा घालायचा… नंतर दोरीने त्यांचे हातपाय बांधायचा… त्यानंतर धारदार चाकून सलगपणे सपासप ५० हून अधिक वार करायचा…

अशा पद्धतीने पहिला हत्या यशस्वी झाली… पोलिसांनी कानोकान खबर लागली नाही… पहिल्या हत्येनंतर आत्मविश्वास इतका दुणावला की, त्याने १९७५ ते १९८१ दरम्यान, १३ वेश्यांची निर्घृणपणे हत्या केली… नंतर पोलिसांच्या हाती लागला… आता तुम्हाला वाटेल की, इतक्या क्रूर व्यक्तीला नक्कीच फाशी झाली असेल; पण तसं अजिबात नाही… या पठ्ठ्याचा बळी शासन-प्रशासनाने नाही तर, चक्क ‘कोरोना’ने घेतला आहे. कोण आहे हा बहाद्दर… जाणून घेऊ या…. त्याची हिस्ट्री!

Yorkshire

‘तो’ इतका क्रूर का झाला? 

या निगरगठ्ठ मनुष्याचं नाव आहे पीटर विल्युम सुटक्लिफ. त्याच्या या कारनाम्याने पत्रकारांनी त्याचं नाव याॅर्कशायर रिपर (Yorkshire Ripper) असं ठेवलं होतं. तो अगदी साधासुदा धार्मिक कौटुंबिक वातावरणात वाढलेला मुलगा होता. १५ वर्षांपर्यंत शिक्षण घेतलं. नंतर तो शिक्षणात रमला नाही. तो शाळेत नेहमी एकटा राहायचा आणि कोणाशीच बोलायचा नाही. विशेष हे की,  तो प्रि-मॅच्युर्ड बेबी होता.

पीटर तिच्या आईवर खूप प्रेम करायचा. वडील धार्मिक असूनही खूप दारू प्यायचे आणि घरी येऊन पीटरच्या आईला मारहाण करायचे. या गोष्टींचा परिणाम त्याच्यावर झाला. शिक्षण सोडून दिल्यानंतर त्यांने नोकरी करण्याचा विचार केला. दरम्यान, १९७० मध्ये वडिलांनी पीटरच्या आईच्या चारित्र्यावर गलिच्छ आरोप करत अपमानित केले. त्याचा परिणाम, पीटरवर झाला. पीटरने तेव्हापासून सर्व महिला धोकेबाज असतात, असा समज करून घेतला.

Yorkshire

हत्या करण्याच्या मानसिकतेमागील खरं कारण

सोनिया स्जुर्मा नावाच्या महिलेवर तो प्रेम करत होता. १९७४ साली त्याने तिच्याशी लग्न केले. मात्र, तिने कित्येकवेळा स्वतःचा गर्भपात करून घेतला होता. शेवटी ती आई होण्याची क्षमता गमावून बसली. नंतर पीटरला लक्षात आले की, त्याची बायको एका आईस्क्रीम विक्रेत्यावर प्रेमसंबंधात होती. त्यामुळे पीटरवर आणखी परिणाम झाला आणि महिलांबद्दलची त्यांची भावना अगदी क्रूर झाली.

पीटर पूर्वीपासूनच कुटंनखान्यात जाऊन वेश्यांशी शरीरसंबंध ठेवत असे. त्यांच्याशी संभोग करण्यासाठी त्याने खूप पैसा उधळलेला होता. नंतर पीटरवर आर्थिक तंगी आली, त्यामुळे त्याने कुंटनखान्यात जाणे सोडून दिले. त्यातच एका पबमध्ये पीटरने जिच्याशी संग केला होता त्या वेश्या महिलेने पीटरला अपमानित केले. तो डिप्रेशनमध्ये गेला. येथून त्याच्या हत्या करण्याच्या मानसिकतेची सुरुवात झाली.

Yorkshire

सीरियल किलिंगची सुरुवात आणि शेवट

३० ऑक्टोबर १९७५ चा दिवस उजाडला. विल्मा मॅक्केन नावाच्या वेश्या महिलेबरोबर पीटरचं कडाक्याचं भांडण झालं. विल्माने पीटरचा खूप अपमान केला होता. त्याचा राग पीटरला मोठा होता. त्यानं गाडीतील हातोडा घेतला आणि विल्माच्या डोक्याच्या मागच्या बाजूस हातोडाने मार दिला. ती खाली कोसळताच धारदार चाकू काढून पीटरने विल्मावर सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली.

हत्येची ही पद्धत पीटरच्या सीरियल किलिंगची ट्रेडमार्क झाली. या पहिल्या हत्येने पीटरचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला. त्याच्या मनात पहिल्यापासून महिलांविषयी राग होता. त्यातल्या त्यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांबाबतीत तो खूप रागिष्ठ होता. पहिल्या घटनेनंतर अवघ्या तीन महिन्यांतच एमिली जॅक्सन नावाच्या महिलेलादेखील त्याने याच पद्धत्तीने मारले. डोक्याच्या मागील बाजूल हातोड्याने मार दिला आणि नंतर एमिलीवर ५१ वेळा चाकूने वार करून तिची हत्या केली.

पोलिसांनी तपास केला; पण त्यांच्या हाती काहीही सापडले नाही. पुन्हा पीटर (Yorkshire Ripper) आपल्या तिसऱ्या हत्येच्या शोधात कुंटनखान्याच्या रस्त्यावरून फिरू लागला. त्याने पुढील वर्षांमध्ये आणखी तीन वेश्या महिलांची त्याच पद्धतीने हत्या केली. हत्येची यादी वाढत गेली तसा पोलिसांचा तपास आणखी वेगाने सुरू झाला. मात्र, ठोस पुरावे नसल्यामुळे पोलीस असमर्थ ठरले.

१९७७ मध्ये पीटर आपल्या सहाव्या शिकारीच्या शोधात मॅंचेस्टरमध्ये निघून गेला आणि तिथे अवघ्या २० वर्षांच्या जीन जाॅर्डन नावाच्या वेश्या मुलीची हत्या केली. पण, यावेळी मात्र त्याच्या खिशातील एक नोट तिथे पडली होती. तो ती नोट घेण्यासाठी गेला. पण, त्याला ती नोट मिळाली नाही. पीटर यानंतर सावध झाला आणि पोलिसांना हूल देऊ लागला. परंतु हत्येचं सत्र त्याने चालूच ठेवलं.

१९७८ मध्ये त्याने आणखी ३ वेश्या महिलांची हत्या केली. तो पोलिसांना हूल देण्यात प्रत्येकवेळी यशस्वी ठरला. इंग्लंडच्या वेश्या गल्ल्यांमधून पीटरने स्वतःची दहशत निर्माण केली होती. याच वर्षी त्याच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने आणखी दोन वेश्या महिलांची हत्या केली. त्याच्या लक्षात आले की, पोलीस आपल्याला वेश्या गल्ल्यांमधून शोधत आहे. तो पोलिसांना चकमा देत निर्जनस्थळी वेश्या महिलांना बोलावून क्रूर पद्धतीने हत्या करतच होता.

Yorkshire

पीटर पोलिसांच्या हाती लागलेला; पण ठोस पुरावे नसल्यामुळे त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले. १९८० साली लिड्समध्ये पीटर आपली शेवटची शिकार जॅकलीन हिल या वेश्या महिलेची हत्या केली. त्यानंतरही त्याने कित्येक महिलांना मारहाण केलेली होती. त्यांची हत्या करण्यात मात्र तो अपयशी ठरला होता.

शेवटी जानेवारी १९८१ साली शेफिल्ड नावाच्या वेश्येसोबत एका चारचाकीमध्ये पोलिसांच्या हाती लागला. बनावट नंबर प्लेटची चौकशी सुरू केला. तेथून तो पळून जाण्यास यशस्वी ठरला. पण, पोलिसांच्या हाती त्याच्या चारचाकीमध्ये एक रस्सी, हातोडा आणि धारदार चाकू सापडले. नंतर तो पोलिसांच्या हाती सापडला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली होती.

दरम्यान, या सीरियल किलिंगचा अख्या शहारात बोलबाला झाला होता. पत्रकारांनी त्याचं नाव ‘याॅर्कशायर रिपर’ (Yorkshire Ripper) असे ठेवलेलं होतं. दोन दिवसांच्या जबरदस्त चौकशीनंतर पीटरने कबूल केले की, मी स्वतःच ‘यार्कशायर रिपर’ आहे. पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली. त्याने हत्या कशा केल्या याची विस्तृत माहिली दिली. कोर्टाने त्याला २० वर्षांची शिक्षा सुनावली. तरुंगात जाताच तो ‘स्क्रिझोफेनिया’ नावाच्या मानसिक रोगाने पछाडलेला आहे, असं समजलं. त्याला उपचारांसाठी दवाखान्यात पाठविलं.

कोरोनाने झाला पीटरचा मृत्यू 

सुमारे १३ वेश्या महिलांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या पीटरवर २० वर्षांची शिक्षा झालेली होती. ८०-९० च्या दशकात आपल्या सीरियल किलिंगने वर्तमानपत्रांची मुख्य पानावर झळकणाऱ्या पीटरने आयुष्याच्या शेवटी पीटर विल्युम सुटक्लिफ स्वतःचे नाव बदलून घेतले आणि आपल्या आईचे पहिले नाव पीटर काॅनन असे ठेवलं. अखेर १३ नोव्हेंबर २०२० रोजी कोरोनाच्या संसर्गामुळे पीटरची जीवनयात्रा संपली.

हे क्राईम स्टोरीज वाचल्या का? 

Back to top button