R Ashwin : वानखेडेवर अश्विनचा ‘गोंधळ’, BOLD झाला तरी DRS मागत राहिला (Video) | पुढारी

R Ashwin : वानखेडेवर अश्विनचा ‘गोंधळ’, BOLD झाला तरी DRS मागत राहिला (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : R Ashwin : टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील मुंबई कसोटीत किवी संघाचा फिरकीपटू एजाज पटेलने आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने भारतीय संघाच्या १० फलंदाजांना बाद करत इतिहास रचला. दरम्यान रविचंद्रन अश्विन एजाजचा सहावा बळी ठरला. त्याने अश्विनला अशा प्रकारे बाद केले की, त्याच्यासोबत काय झाले हे या भारतीय फलंदाजाला समजलेही नाही.

वास्तविक, अश्विन फलंदाजीला आला तेव्हा एजाज पटेलच्या पहिल्याच चेंडूवर (७१.५ वे षटक) तो क्लीन बोल्ड झाला. अश्विनला वाटले की यष्टिरक्षकाने झेल घेण्याचे अपील केले. बॅटला चेंडू स्पर्श करून गेलेला नाही यावर अश्विन ठाम होता. झालंही तसंच होतं. अश्विन किल्न बोल्ड झाला होता. पण याची पुसटशी कल्पना त्याला आली नाही. विकेटकिपर झेल पकडल्याचे अपील करत असल्याचे अह्विनला वाटले. त्यामुळे क्षणाचा विलंब न करता त्याने मागे वळून न पाहता डीआरएसची (DRS)ची मागणी केली.

पण चूक लक्षात येताच अश्विनने मागे वळून पाहिलं. तेव्हा त्याला आपला क्लिन बोल्ड झालो आहे हे लक्षात आले. हे पाहून अश्विन गोंधळला. त्याच्या चेह-यावरून स्पष्ट दिसत होते की, एजाजच्या फिरकीने त्याचा गोंधळ उडवला होता. क्रिजवर आल्याआल्य त्याला थेट पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले होते. मैदानात उडालेल्या अश्विनच्या गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेकांनी अश्विनची सोशल मीडियात फिरकी घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

अश्विनला खातेही उघडता आले नाही…

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने 4 विकेट्सवर 221 धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली. 224 धावांवर एजाज पटेलने ऋद्धिमान साहा आणि रविचंद्रन अश्विनला लागोपाठ 2 चेंडूंवर बळी बनवले. साहाने 27 धावा केल्या, तर अश्विन पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा आज दुसरा दिवस आहे. मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळ सुरू आहे. टीम इंडियाने कालच्या ४ बाद २२१ धावसंख्येपुढे फलंदाजी करण्यास सुरुवात केली. पण भारताची सुरुवात खराब झाली. भारताचा डाव १०९.५ षटकात ३२५ धावांत संपुष्टात आला. किवी गोलंदाज एजाज पटेलने भीम पराक्रम करत वानखेडेवर यजमान भारताविरुद्ध एका डावात १० विकेट घेवून इतिहास रचला आहे. यापूर्वी इंग्लंडच्या जीम लेकर (१९५६), भारताचा अनिल कुंबळे (१९९०) यांनी एका डावात १० विकेट्स घेण्याची किमया केली होती.

Back to top button