मलेरियाला हरवण्यात यश; राज्यात मृत्यदर शून्यावर | पुढारी

मलेरियाला हरवण्यात यश; राज्यात मृत्यदर शून्यावर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  मलेरियामुळे यावर्षी राज्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. डासांची पैदास होऊ नये म्हणून आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि कोरडा ठेवण्याच्या आरोग्य विभागाच्या आवाहनाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. वर्षभरात 2 हजार 650 रुग्णांची नोंद झाली. मात्र, ते उपचारानंतर बरे झाले आहेत.

मलेरियामुळे सर्वाधिक धोका पाच वर्षांखालील बालकांना व गर्भवती महिलांना असतो. या गटात अधिक मृत्यूंची संख्या आढळत असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

राज्यामध्ये मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने आराखडा तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.
– डॉ. राधाकिशन पवार, सहसंचालक, आरोग्य विभाग

Back to top button