माझे बोट धरून मोदी राजकारणात..: शरद पवारांची नरेंद्र मोदींवर टीका | पुढारी

माझे बोट धरून मोदी राजकारणात..: शरद पवारांची नरेंद्र मोदींवर टीका

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत येऊन भाषणात सांगितले, की शरद पवार यांचे बोट धरून मी राजकारणात आलो. ही मोठी गमतीची गोष्ट आहे. देशाचे पंतप्रधान माझे बोट धरून राजकारणात येतात यावर कसा विश्वास ठेवायचा? अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या, अनेक आश्वासने त्यांनी दिली, परंतु त्याची पूर्तता काही त्यांनी केली नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

मंगळवारी (दि. 16) इंदापूरमध्ये जाहीर सभेत शरद पवार बोलत होते. पवार म्हणाले की, देशाची सत्ता कोणाच्या हातामध्ये द्यायची आहे, याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. ज्या कुटुंबाने अनेक वर्षे देशाच्या स्वातंत्र्याआधी व देश स्वतंत्र झाल्यानंतर देशाची सेवा केली, अशा कुटुंबाच्या हातात देशाची सत्ता द्यायची की, माणूस, जात, धर्म, भाषांमध्ये दुरावा वाढविण्यासाठी सत्तेचा गैरवापर ज्यांनी केला, त्यांच्या हातात सत्ता द्यायची? मी अनेक राज्यांत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांत जात असतो. मी बघतोय की या वेळी लोकांची मन:स्थिती वेगळी दिसत आहे. आता लोकांच्या लक्षात आले आहे की या देशाची सत्ता पुन्हा मोदींच्या हातात द्यायची नाही. जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना जवळ घेतात. मोदींच्या पक्षात घेतात आणि त्यांना स्वच्छ करतात. आज मोदींचे सरकार भ्रष्टाचार्‍यांना स्वच्छ करण्याचे ‘क्लिनिंग मशिन’ झालं आहे.

हेही वाचा

Back to top button