MI vs RCB : मुंबईने गड राखला; बंगळुरूवर सात गडी राखून विजय | पुढारी

MI vs RCB : मुंबईने गड राखला; बंगळुरूवर सात गडी राखून विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 च्या 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने RCB विरुद्ध सात गडी राखून विजय मिळवला. दुसऱ्या विजयासह, मुंबईने गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. तर आरसीबी नवव्या स्थानावर आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बंगळुरूने 20 षटकांत आठ गडी गमावून 196 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने 15.3 षटकांत तीन गडी गमावून 199 धावा केल्या. (MI vs RCB)

इशान – रोहितची आक्रमक सुरूवात

197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी मुंबईला दमदार सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी झाली. इशान किशनने या सामन्यात 202.94 च्या स्ट्राईक रेटने सात चौकार आणि पाच षटकार मारले. तो 69 धावा करून बाद झाला. तर, हिटमॅन 38 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 12व्या षटकात रीस टोपलीच्या हाती तो विल जॅककरवी झेलबाद झाला.

सूर्याचे झंझावाती अर्धशतक

मुंबईसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने स्फोटक कामगिरी केली. त्याने अवघ्या 17 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याने 273.68 च्या स्ट्राईक रेटने 52 धावांची दमदार खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून पाच चौकार आणि चार षटकार आले. त्याला विजयकुमार विशाकने लोमराच्या हाती झेलबाद केले. यानंतर हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी डावाची धुरा सांभाळत संघाला विजयाकडे नेले. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये 23 धावांची नाबाद भागीदारी झाली. हार्दिकने सहा चेंडूत तीन षटकारांच्या मदतीने 21 धावा केल्या. तर टिलक वर्माने 10 चेंडूत 16 धावा केल्या. आरसीबीतर्फे आकाश दीप, विजयकुमार विशाक आणि विल जॅक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्पूर्वी, आयपीएलच्या 25 व्या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून मुंबईविरुद्ध 196 धावा केल्या. बेंगळुरूकडून फाफ डुप्लेसिसने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 61 धावांची दमदार खेळी केली. तर रजत पाटीदारने अर्धशतकी खेळी केली. सामन्यात विराट कोहलीला केवळ तीन धावा करता आल्या. 14 धावांवर बुमराहने त्याला आपला शिकार बनवले. बुमराहने कोहलीला आयपीएलमध्ये पाचव्यांदा बाद केले. विल जॅकच्या रूपाने संघाला दुसरा धक्का बसला. पदार्पणाच्या सामन्यात जॅकला केवळ आठ धावा करता आल्या. तो 23 धावांवर आकाश मधवालने बाद केला. (MI vs RCB)

यानंतर फाफ डुप्लेसिस आणि रजत पाटीदार यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची मोठी भागीदारी झाली, जी गेराल्ड कोएत्झीने मोडली. इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या पाटीदारला त्याने यष्टीरक्षकाकडून झेलबाद केले. अर्धशतकी खेळी खेळून तो बाद झाला. यादरम्यान त्याने 192.30 च्या स्ट्राईक रेटने तीन चौकार आणि चार षटकार मारले. यानंतर लगेचच ग्लेन मॅक्सवेलची विकेट पडली तो शून्यावर बाद झाला.

आरसीबीसाठी बुमराह डोकेदुखी ठरला. त्याने तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कर्णधार फाफ डुप्लेसिसला टिम डेव्हिडकरवी झेलबाद केले. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बुमराहने महिपाल लोमराला एलबीडब्ल्यू आऊट केले. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.

यानंतर बुमराहने पुन्हा 19व्या षटकात लागोपाठ दोन चेंडूत दोन विकेट घेतल्या. त्याने सौरव चौहान आणि विजयकुमार विशाक यांना बाद केले. यासह त्याने पाच विकेट्स मिळवण्याची कामगिरी केली. तर दिनेश कार्तिकने दमदार कामगिरी केली. त्याने 22 चेंडूत 21 वे अर्धशतक पूर्ण केले. 23 चेंडूत 53 धावा करून तो नाबाद राहिला. या दरम्यान त्याने स्ट्राईक रेटने पाच चौकार आणि चार षटकार ठोकले. तर आकाश दीप दोन धावा करून नाबाद राहिला. मुंबईतर्फे बुमराहने पाच तर गेराल्ड कोएत्झी, आकाश मधवाल आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा :

Back to top button