निलेश सांबरे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात | पुढारी

निलेश सांबरे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात

भिवंडी ः पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेवर असलेले जिजाऊ संघटना या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक क्षेत्रात काम करणार्‍या संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी अखेर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भिवंडी लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

या मतदारसंघात ग्रामीण आरोग्याची, लोकसंख्येत मोठी वाढ झालेली असताना रेल्वे सेवेत वाढ झाली नसल्याची समस्या मोठी असून त्यावर लक्ष ठेवून आपणा जनतेच्या प्रश्नावर जनतेचा खासदार म्हणून काम करणार, असा निर्वाळा निलेश सांबरे यांनी दिला आहे.
विशेष म्हणजे सांबरे यांनी जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून कोकणातील ठाणे, भिवंडी, कल्याण पालघर, रायगड आणि रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचेही पत्रकार परिषदेत जाहीर केले.

भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना तिसर्‍यांदा महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली, तर महाविकास आघाडीतून सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना आघाडीतून तुतारीच्या चिन्हावर उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता निलेश सांबरे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केल्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.

Back to top button