जळगाव : मद्रास बेकरीच्या नविन स्टॉलच्या कारणावरुन भुसावळ रेल्वे स्टेशनवर दोन गटांमध्ये वाद | पुढारी

जळगाव : मद्रास बेकरीच्या नविन स्टॉलच्या कारणावरुन भुसावळ रेल्वे स्टेशनवर दोन गटांमध्ये वाद

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
भुसावळ येथील रेल्वे आर.पी.एफ. निरीक्षक राधा किशन मीना (वय ४२) व त्यांचे सहकारी आरक्षक महेंद्र कुशवाह यांच्यावर प्लॅटफॉर्म नं. 5/6 वरील खंडवा बाजूच्या ब्रिजजवळ बेकायदेशिर जमावाने हल्ला केला व आर.पी.एफ. निरीक्षक राधा किशन मीना यांना धक्काबुक्की करुन जखमी केले तसेच सहकारी आरक्षक महेंद्र कुशवाह यांना मारहाण करुन व चेहऱ्यावर देखील मारुन गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी जी आर पी पोलीसात मंगळवार (दि.२) रोजी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्र. 5 च्या जळगाव एरंड बाजूकडे मद्रास बेकरीच्या नवीन स्टॉलचे उद्घाटन झाले. उ‌द्घाटनासाठी आलेले नागरिक व प्लॅटफॉर्म नं. 6 वरील एमआर एंटरप्रायझेस्चे वेंडर आणि इतर नागरिक असे जवळ जवळ १५० नागरिक जमा झाले होते. मद्रास बेकरीच्या नविन स्टॉलच्या कारणावरुन दोन्ही गटांमध्ये आपसात वाद सुरु असल्याची माहिती दिपक तायडे यांनी फोनद्वारे आर.पी.एफ. निरीक्षक, राधा किशन मीना हे त्यांच्या शासकीय कर्तव्यावर मुख्य पार्सल कार्यालय भुसावळ येथे हजर असताना दिली. तसेच या घटनेबाबत जी.आर.पी. भुसावळचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मगरे यांना देखील माहीती दिली व तत्काळ स्टाफ पाठविणेबाबत कळविण्यात आले. रेल्वे पोलीस निरीक्षक मीना यांनी प्लॅटफॉर्म नं. 6 वर पोहचुन तेथे उपस्थित एम आर इंटरप्राईजचे चे सुपरवायझर अफसर रफीक मेमन, रियाज अब्दुल मोहम्मद रहेमान, शेख कलिमोद्दीन शेख अलीमोद्दीन, शेख नदीम नथ्थु बागवान तसेच मद्रास बेकरीचे सय्यद हमिद सय्यद कासिम, रईस सद्दाम बागवान (रईस पहेलवान), सय्यद कासिफ सय्यद हमिद, शेख इरफान शेख चाँद तथा दोन्ही गटांचे इतर जवळ जवळ 150 नागरिकांना आरपीएफ व जीआरएफ स्टाफ यांनी वाद सोडवून वातावरण शांत केले.

त्यातील मुख्य व्यक्तींना आरपीएफ पोस्ट भुसावळ स्टेशन येथे घेवुन गेले असता फिर्यादी व त्यांचे सहकारी स्टॉफ प्लॅटफॉर्मवरील बेकादेशिर जमाव नियंत्रित करीत असतांना प्लॅटफॉर्म नं. 5/6 वरील खंडवा बाजुच्या ब्रिजजवळ बेकायदेशिर जमावामधील सद्दाम शेख बशीर, आझाद शेख बशीर, शेख सलमान शेख बशीर, मुझफ्फर सय्यद लियाकत अली, शेख समीर शेख हमिद, वसीम खान बिस्मिल्ला खान व इतर आरोपींनी मिळून आर पी एफ निरीक्षक मीना व त्यांचे सहकारी आरक्षक महेंद्र कुशवाह यांच्यावर हल्ला केला व आर पी एफ निरीक्षक मीना हे धक्काबुक्की झाल्याने जखमी झाले. त्यांच्या शासकिय गणवेशाची कॉलर ओढल्याने शर्टचे बटण तुटले व आरक्षक महेंद्र कुशवाह यांना हाताने व लाथाने मारहाण करुन व चेह-यावर मारुन गंभीर जखमी केले आहे. त्यावेळी त्याठिकाणी हजर असलेल्या इंतर स्टाफ मधील आरक्षक जे. पी. मिना व सहायक पोलीस निरीक्षक दिपक तायडे व इतर एमएसएफ स्टाफने फिर्यादी व जखमी यांची जमावाच्या तावडीतुन सुटका केली त्यावरून आर पी एफ निरीक्षक मीना यांनी जी.आर.पी. पोलीस ठाणे भुसावळ येथे दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल केला आहे

हेही वाचा:

Back to top button