सोलापूर: ढोकरी येथे अवैध वाळू उपसाप्रकरणी मोठी कारवाई; ६६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक | पुढारी

सोलापूर: ढोकरी येथे अवैध वाळू उपसाप्रकरणी मोठी कारवाई; ६६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

करमाळा: पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील ढोकरी गावच्या हद्दीत उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात अवैधरित्या वाळू उपसा करताना मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सोलापूर व महसूल विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली. यावेळी तीन परप्रांतीय मजुरांना रंगेहात पकडण्यात आले. याशिवाय दोघेजण शिवीगाळ व दमबाजी करून फरार झाले. बोट मालकासह एकूण सहा संशयितांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तर 66 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रबिऊल शेख (वय 32), आमीर शेख (वय 24) , युसुफ शेख (वय 37, सर्व रा. गुहिटोला, ठाणा राधानगर, जि. साहेबगंज, राज्य झारखंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

तर पप्पू राजेंद्र सल्ले (रा. खोरची, ता. इंदापूर, जि. पुणे) व विकास नवनाथ देवकर (रा. सरडेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) या संशयितांनी शिवीगाळ व दमदाटी करून पळ काढला आहे. बोटीचे मालक युवराज उर्फ युवा फलफले (ता. इंदापूर) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली विजयकुमार भरले, धनाची गाडे, गणेश बांगर, धनराज गायकवाड, अक्षय डोंगरे, राजेंद्र गवेकर या पोलीस कर्मचा-यांच्यासह महसूल पथकाचे तहसीलदार शिल्पा ठोकडे, नायब तहसीलदार अब्दुल माजीद काझी, विजयकुमार जाधव, मंडळ अधिकारी प्रकाश जगताप, तलाठी संतोष कांबळे, गोरक्षनाथ ढोकणे, ज्ञानेश्वर बोराडे, आनंद डोणे, कदम आदिच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button