जळगाव : 'पोलीस स्टेशन एम्पलोयी ऑफ द मंथ' पुरस्काराने भुसावळचे पोलीस सन्मानित | पुढारी

जळगाव : 'पोलीस स्टेशन एम्पलोयी ऑफ द मंथ' पुरस्काराने भुसावळचे पोलीस सन्मानित

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
भुसावळ उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यामध्ये दैनंदिन कामगारांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस स्टेशन एम्पलोयी ऑफ द मंथ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यालय अंतर्गत येणाऱ्या उत्कृष्ट काम करणारे कर्मचाऱ्यांना पोलीस स्टेशन एम्पलोयी ऑफ द मंथ पुरस्कार देण्यात येताे. यामध्ये मार्च-२०२४ भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार मोहम्मद अली सत्तार अली सय्यद यांनी गुन्ह्याची पडताळणी करून फिर्याद खोटी असल्याचे निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणला. तर बाजारपेठ पोलीस ठाण्याचे महेश एकनाथ चौधरी यांनी चोरीला गेलेल्या १२ मोटरसायकली जप्त केल्या. तालुका पोलीस ठाण्याचे जगदीश चावदस भोई यांनी क्राईमचा अभिलेख अद्यावत ठेवल्यानंतर फायलिंग केले. नशिराबादचे तुषार विजय पाटील यांनी बार्शीच्या कामासह पाेलीस स्टेशन मधील आलेले अर्ज निर्गमित केले. अभिनंदन पाटील  यांनी भुसावळ वाहतूक शाखेचे कर्मचारी मोटर व्हेईकल ॲक्ट नुसार ३१९ केसेस सॉल्व्ह केल्या.

याचबरोबर तालुका पोलीस स्टेशनमध्ये कायदेविषयक परीक्षा घेण्यात आल्या. यामध्ये प्रथम क्रमांक समाधान पांडुरंग पाटील, तृतीय क्रमांक सहाय्यक फौजदार मोहम्मद अली सत्तार अली सय्यद, कॉन्स्टेबल कैलास अशोक बाविस्कर यांचा सत्कार करण्यात आला. भुसावळ शहरात पकडण्यात आलेल्या मेथाक्वालोन या अमली पदार्थ उत्तरचा विक्री करणारा व विकणाऱ्या या दोघांना मुंबई भुसावळ व इतर दोघे आरोपींना अटक केल्याबद्दल तत्पर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

एम्पलोयी ऑफ द मंथ व इतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सत्कार उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक गजानन पडघम, संदीप रणदिवे, बबन जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, रूपाली चव्हाण, भुसावळ विभागातील दुय्यम अधिकारी व साठ पोलीस अंमलदार व कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button