आम आदमी पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष सीमा शिवाजी गुट्टेंचा काँग्रेस पक्षात प्रवेश | पुढारी

आम आदमी पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष सीमा शिवाजी गुट्टेंचा काँग्रेस पक्षात प्रवेश

मुंबई; पुढारी वत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या धामधुकीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढत आहे. आम आदमी पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष सीमा शिवाजी गुट्टे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सोमवारी टिळक भवनमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी नाना पटोले यांनी सीमा गुट्टे यांचे काँग्रेस कुटुंबात स्वागत केले.

संबंधित बातम्या 

सीमा गुट्टे यांनी सामाजिक, शैक्षणिक व महिला सशक्तीकरणासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. आम आदमी पार्टीच्या पुणे जिल्हा महिला बचत गटाच्या जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. मुलींच्या शैक्षणिक समस्यांवर कार्यशाळा आयोजित करणे, महिलांसाठी आरोग्य शिबिरे, सामाजिक ऐक्य व राष्ट्रीय उत्सवांमध्ये त्यांचा नेहमी सहभाग राहिला आहे.

देश सध्या बिकट परिस्थितीतून जात असताना काँग्रेसची विचारधारा या देशाला तारु शकते. सर्व समाज घटकांना न्याय देण्याची काँग्रेस पक्षाची परंपरा राहिली आहे. भारत जोडो न्याय यात्रेमुळे सर्वसामान्य जनतेचा काँग्रेस पक्षावरील विश्वास आणखी दृढ झाला आहे. भारत जोडो न्याय यात्रेच्या दरम्यान महिला सक्षमीकरणावर विशेष भर देत ‘महिला न्याय’ च्या पाच गॅरंटी काँग्रेस पक्षाने दिलेल्या आहेत. असेही ते म्हणाले

काँग्रेसमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढत असून लवकरच इतर पक्षातील आणखी लोक काँग्रेसमध्ये प्रवेश करतील” असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले. या पक्ष प्रवेशावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे हे उपस्थित होते.

Back to top button