कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात रंगीबेरंगी कीटकांची दुनिया! | पुढारी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात रंगीबेरंगी कीटकांची दुनिया!

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठ प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने 450 प्रजातींच्या तब्बल 2,200 कीटकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने लहान-मोठ्या रंगीबेरंगी कीटकांची दुनिया पाहायला मिळणार आहे.

प्राणीशास्त्र विभागात होणार्‍या कीटक प्रदर्शनाचे बुधवारी सकाळी 10.30 वाजता कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते व प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. एस. बी. खरबडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अन्नसाखळीत कीटकांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. निसर्गाच्या समतोलासाठी कीटक हा उपयुक्त प्राणी आहे. विविध प्रजातींचे असंख्य कीटक आढळतात. या घटकाविषयी माहिती व्हावी, यासाठी प्रदर्शन भरविण्यात आल्याचे प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए. ए. देशमुख, समन्वयक प्रा. डॉ. एस. एम. गायकवाड यांनी सांगितले. विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागात 13 ते 15 मार्चदरम्यान कीटक प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सकाळी 10.30 ते 6 या वेळेत हे प्रदर्शन खुले असणार आहे.

Back to top button