Nashik Bribe News : पंधरा हजाराची लाच घेताना ग्रुप ग्रामपंचायतीचा सदस्य जाळ्यात | पुढारी

Nashik Bribe News : पंधरा हजाराची लाच घेताना ग्रुप ग्रामपंचायतीचा सदस्य जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- येवला तालुक्यातील चिंचोडी खु. बदापुर ग्रुप ग्रामपंचायतीचा सदस्य रामनाथ उमाजी देवडे यास पंधरा हजाराची लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.

बदापूर येथील जिल्हा परिषद शाळेसाठी पीएम निधीतून सात लाख ३० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या निधीतून शाळा सुशोभीकरण आणि परसबागेचे काम सुरू होते. मात्र, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या कामात कोणताही अडथळा आणणार नसल्याचे सांगत रामनाथ देवडे याने जिल्हा परिषद शाळेचे शालेय समितीच्या अध्यक्षांकडे वीस हजारांची लाच मागितली होती. मात्र, तडजोडीअंती पंधरा हजार रुपये मागितले. याबाबतची तक्रार शालेय समिती अध्यक्षांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली असता, पथकाने सापळा रचून १५ हजारांची लाच स्विकारताना रामनाथ देवडे याला रंगेहाथ पकडले आहे. त्याच्याविरोधात येवला शहर पोलिस ठाण्यात भ्रष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

Back to top button