रायगड : तळोजा कारागृहात दोन कैद्यांमध्ये हाणामारी | पुढारी

रायगड : तळोजा कारागृहात दोन कैद्यांमध्ये हाणामारी

पनवेल : पुढारी वृत्तसेवा :  तळोजा कारागृहात बंदिस्त असलेल्या दोन कैद्यांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीत एका कैद्याच्या जबड्याला दुखापत झाली, तर दुसर्‍याचा दात पडून तो जखमी झाला. या दोन्ही कैद्यांनी आपसात मारामारी करून कारागृहाची शांतता भंग केल्याने तसेच एकमेकांना दुखापत केल्याने या दोन्ही कैद्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.

कारागृहातील हाणामारीत जखमी झालेल्या कैद्यांमध्ये अजिंक्य अनंत शिंदे ऊर्फ अवी (32) व किसन विजय भोसले (30) या दोघांचा समावेश आहे. या दोन्ही कैद्यांना कारागृहातील बॅरेक नंबर-7 मध्ये ठेवण्यात आले होते. सुरक्षेच्या कारणास्तव दोघांची वेगवेगळ्या बॅरेकमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

Back to top button