Ayodhya Ram Temple : अयोध्येतील राम मंदिर रोज 1 तास बंद ठेवण्याचा निर्णय
![](https://d2n2y7fp2ncdvv.cloudfront.net/files/2024/02/17022056/Ayodhya-Ram-temple-4.jpg)
अयोध्या; वृत्तसंस्था : अयोध्येतील राम मंदिर रोज दुपारी एक तास बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिरातील मुख्य पुरोहितांनी ही माहिती दिली. (Ayodhya Ram Temple)
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर राम मंदिरातील रामलल्लाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत. त्यामुळे मंदिर व्यवस्थापन समितीने राम मंदिर सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता दुपारी 12.30 ते 1.30 वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आचार्य सत्येंद्र दास यांनी दिली. (Ayodhya Ram Temple)