गद्दार मंत्र्याची सात वाजेनंतर परिस्थिती गंभीर असते, आदित्य ठाकरेंचा कुणाला टोला? | पुढारी

गद्दार मंत्र्याची सात वाजेनंतर परिस्थिती गंभीर असते, आदित्य ठाकरेंचा कुणाला टोला?

जळगांव : पुढारी वृत्तसेवा– लोकांचे आशीर्वाद व प्रेम मिळत आहे, त्यामुळे उशीर झाला असे बोलत किती वाजले चार ना म्हणजे मी बोलतो आहे ते गद्दार मंत्र्याला समजेल. कारण सात वाजेनंतर परिस्थिती गंभीर असते. हा माझा अनुभव आहे. कारण मी त्यांना जवळून बघितले आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिरसोली येथील सभेत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना उद्देशून नाव न घेता टोला लगावला.

आमदार आदित्य ठाकरे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना दुपारी शिरसोली येथे जळगाव ग्रामीण मतदार संघात झालेल्या सभेत त्यांनी नामदार गुलाबराव पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. त्यांची सात वाजेनंतर परिस्थिती गंभीर असते असा आरोप केला.

त्यांनी गुलाबराव पाटील यांना गद्दार मंत्री असे संबोधले. जे झाले ते मागे झाले आता आपल्याला नवीन भविष्य घडवायचे आहे. भाजपा ही राज्यात बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे वाढली. भाजपाला आता पुन्हा चार घटक आठवले आहेत. यात महिला, शेतकरी, युवक व गरीब यांचा समावेश आहे. मग दहा वर्षात यांनी कोणाची सेवा केली असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र राज्यात खोके सरकार आहे. राज्यात भाजपनेच पक्ष फोडान्याचे राजकारण केले. 2022 मध्ये शिवसेना फोडली. 2023 मध्ये राष्ट्रवादी फोडली. 2024 मध्ये काँग्रेस फोडत आहेत असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

महिला, शेतकरी, युवक व गरीब चारही घटक भाजपवर नाराज आहेत. राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. जिल्ह्यातील बावीस हजार शेतकरी पिक विमा पासून वंचित राहिलेले आहेत. देशात व राज्यात तोच प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या केंद्र व राज्य सरकार ऐकत नाही. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलं. आपत्तीच्या काळातही शेतकऱ्यांना मदत केली व ती त्यांच्यापर्यंत पोहोचली आता चे सरकार तुमचे आमचे सरकार नाही आहे ते आपल्या डोक्यावर बसवलेले आहे.  ते फक्त गुजरातच्या हिताचे सरकार आहे. महाराष्ट्र राज्याच्या हिताचे सरकार  नाही. येत्या काळात होणाऱ्या लोकसभा विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांत तुम्ही जे मतदान करणार ते भांडण लावणाऱ्यांना देणार की हिताचा विचार करणाऱ्यांना? ते आताच ठरवा. भांडणे पाहिजे की प्रगती पाहिजे असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.

हेही वाचा :

Back to top button