Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शनिवार, २० जानेवारी २०२४ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शनिवार, २० जानेवारी २०२४

मेष : धर्मादाय कामामध्ये स्वतःला गुंतवल्यास मनःशांती लाभेल. प्रलंबित देणी आल्यामुळे सांपत्तिक स्थिती सुधारेल. सामाजिक कामात रमाल.

वृषभ : नवीन गोष्टी शिकण्याकडे कल असून, तो उल्लेखनीय ठरेल. परिस्थितीपासून दूर पळून जाल तर येनकेनप्रकारे ती खिंडीत पकडेल.

मिथुन : मौज, मस्ती, मजा आणि करमणुकीचा दिवस, आर्थिक आघाडीवरील सुधारणा प्रलंबित देणी देण्यास उपयोगी पडतील.
कर्क : व्यावसायिकांना चांगला दिवस, व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला प्रवास हा लाभदायक ठरेल, लोकांसोबत बोलण्यासाठी वेळ देऊ शकता.

सिंह : विनोदबुद्धीमुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला आनंद द्याल. आनंद हा वस्तूंच्या मालकीमध्ये नसतो, तर तो तुमच्या आतमध्ये दडलेला असतो.

कन्या : विचारपूर्वक धन खर्च करा. सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी घरी नातेवाईक गर्दी करतील.
तूळ : कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. प्रेमातील वेदनेचा अनुभव मिळण्याची शक्यता. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते.

वृश्चिक : पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज भासेल, प्रेमप्रकरण वेगळे वळण घेईल. अर्थात, त्यात तुमचे भलेच होईल.

धनु : कुटुंबातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे त्रासून जाल; परंतु राग अनावर होऊ दिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल.

मकर : प्रदीर्घ काळापासून अनुभवत असलेल्या तणावापासून मुक्त व्हाल. तुमची जीवनशैली बदलायला हवी, मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा.

कुंभ : तुमच्या योजना बारगळवण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करतील म्हणून अवती-भोक्तीचे लोक काय करत आहेत, यावर लक्ष ठेवा.

मीन : लोकांसमोर तुम्ही तुमची कौशल्ये व बुद्धिमत्तेची चुणूक दाखवलीत, तर लवकरच तुमची सार्वजनिक प्रतिमा चांगली बनेल.

– ज्यो. मंगेश महाडिक

Back to top button