शेअर बाजार ‘पडझडी’ने उघडला; सेन्सेक्स ७०० अंकांनी घसरला! | पुढारी

शेअर बाजार 'पडझडी'ने उघडला; सेन्सेक्स ७०० अंकांनी घसरला!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जागतिक बाजारपेठांमध्‍ये संमिश्र संकेताचे परिणाम आज ( दि.१७) सलग दुसर्‍या दिवशी शेअर बाजारावर पाहायला मिळाले. प्रमुख निर्देशांक 1-1 टक्क्यांनी घसरले. सेन्सेक्स 700 अंकांनी घसरून 72,400 वर व्यवहार करत आहे. तर निफ्टीही 200 अंकांनी घसरण अनुभवत 21,800 च्या जवळ पोहोचला.

मंगळवारी ( दि.१६) सेन्सेक्स १९९ अंकांनी घसरून ७३,१२८ वर बंद झाला होता. आज जागतिक बाजारपेठांमधील नकारात्‍मक परिणामाचे पडसाद देशातंर्गत शेअर बाजारावर उमटले. बहुतांश आशियाई बाजारातही घसरण होत आहे. गिफ्टी निफ्टी जवळपास अडीचशे अंकांनी घसरला आहे.

आज लार्जकॅप आणि स्मॉलकॅप समभागांनी वाढलेल्या घसरणीच्या आघाडीसह व्यापक निर्देशांक लाल रंगात उघडले. बँक निफ्टी निर्देशांक 1551.15 अंकांनी किंवा 3.22 टक्क्यांनी घसरून 46,573.95 वर स्थिरावला. दरम्‍यान,  एचडीएफसी बँकेने तिसऱ्या तिमाहीत कमकुवत निकाल सादर केले. व्याज उत्पन्न 4% सह अपेक्षेपेक्षा कमी वाढले. त्रैमासिक आधारावर तरतुदीत वाढ झाली. नवीन एनपीएही अपेक्षेपेक्षा जास्त होता. एचडीएफसी बँकेचा एडीआर सुमारे 7% घसरला आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button