उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टात जावं लागणार : शरद पवार | पुढारी

उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टात जावं लागणार : शरद पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचा अंतिम निकाल जाहीर केल्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर उद्धव ठाकरेंना आता कोर्टात जावं लागेल.

शिवसेना पक्षाच्या आमदार आपात्र प्रकरणाचा अंतिम निकाल आज (दि. १०) विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर य़ांनी दिला. या निकालामध्ये खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल देण्यात आला. या निकालानंतर राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना ते म्हणाले की, गृहित धरल्याप्रमाणे हा निकाल लागला आहे. सत्ताधाऱ्यांना आधीच निकाल माहित होता. अध्यक्षांनी विधीमंडळ पक्षाला महत्त्व दिलं आहे. व्हीप देण्याचा निर्णय पक्षाचा असतो. नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर उद्धव ठाकरेंना आता कोर्टात जावं लागेल.

Back to top button