पोटच्या गोळ्याची वडिलांनीच केली अडीच लाखांत तेलंगणात विक्री! | पुढारी

पोटच्या गोळ्याची वडिलांनीच केली अडीच लाखांत तेलंगणात विक्री!

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : दारूच्या आहारी गेलेल्या वडिलाने बायको सततच्या वादाला कंटाळून माहेरी गेल्यानंतर अन्य तिघांना सोबत घेत स्वत:च्याच मुलाची अडीच लाख रुपयांत तेलंगणात विक्री केल्याची घटना विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात उघडकीस आली आहे. मात्र, याची कुणकुण तीन वर्षीय बालकाच्या आईला लागताच तिने थेट आर्णी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंद करीत दोघांना फोन व नोटांसह अटक केली.

वडील श्रावण दादाराव देवकर (वय 32), चंद्रभान लकडाजी देवकर (65, दोघेही रा. कोपरा), कैलास लक्ष्मण गायकवाड (55, रा. गांधीनगर, आर्णी), बाल्या गोडंबे (रा. महागाव, कलगाव), अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. त्यापैकी श्रावण व चंद्रभान यांना अटक करण्यात आली आहे. तेलंगणात बालकाची विक्री झाल्याची माहिती मिळताच पोलिस पथकाने जगटाल जिल्ह्यातील मोहनरावपेठ गाठले. बालकाला सुखरूप ताब्यात घेतले. बोलली गंगाराम राजू (45, रा. मोहनरावपेठ) या महिलेने अरविंद रामय्या उसकेमवार (45, रा. भाग्यनगर, आदिलाबाद) या एजंटच्या माध्यमातून बालक खरेदी केले होते. त्यांनाही ताब्यात घेत आर्णी पोलिसांनी मानवी तस्करीचा पर्दाफाश केला असल्याची माहिती डॉ. पवन बन्सोड, पोलिस अधीक्षक, यवतमाळ यांनी दिली.

Back to top button