आव्हाड यांच्याविरुद्ध दोन गुन्हे | पुढारी

आव्हाड यांच्याविरुद्ध दोन गुन्हे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिर्डी येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रभू श्रीरामाविषयी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध 24 तासांत घाटकोपर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. बहुजनांचे राम मासांहारी होते या वक्तव्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाल्याने त्यांची लवकरच पोलिस चौकशी करुन जबाब नोंदवणार आहेत.

3 जानेवारी शिर्डी येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात आव्हाड यांनी प्रभू रामचंद्र यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. सोशल मीडियावर आव्हाड यांचे वक्तव्य व्हायरल होताच महाराष्ट्रासह देशभरात संतप्त पडसाद उमटले होते. हिंदू संघटनांनी आव्हाड यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करुन मोर्चा काढून त्यांचा निषेध व्यक्त केला होता. यानंतर दुसर्‍या दिवशी आव्हाड यांनी माफी मागतानाच वक्तव्यावर ठाम असल्याचे जाहीर केले होते. भाजप आमदार राम कदम यांच्या तक्रारीनंतर घाटकोपर ठाण्यात आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अन्य एका गुन्ह्यांची एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Back to top button