नाशिक : टास्क पूर्ण करण्याच्या नादात युवकाने गमावले ९४ लाख  | पुढारी

नाशिक : टास्क पूर्ण करण्याच्या नादात युवकाने गमावले ९४ लाख 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ऑनलाइन काम करण्याच्या बहाण्याने टास्क पूर्ण करण्यास सांगत भामट्याने शहरातील एका युवकास ९४ लाख १३ हजार ४४१ रुपयांचा गंडा घातला आहे. युवकास १५ ते २० नोव्हेंबरदरम्यान हा गंडा घातला असून, या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात फसवणुकीसह माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षल शिंपी (रा. अंबड) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. हर्षल यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना पार्टटाइम जॉबच्या बदल्यात पैसे देण्याचे आमिष भामट्याने दाखवले. तसेच हर्षल यांना काही टास्क ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्यास सांगितले. त्यानुसार हर्षल यांनी काम केले. मात्र, भामट्याने हर्षल यांना वेगवेगळी कारणे देत हर्षल यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. त्यानुसार हर्षल यांनी ऑनलाइन पद्धतीने ९४ लाख १३ हजार ४४१ रुपये भामट्याने सांगितलेल्या बँक खात्यांमध्ये वर्ग केले. मात्र, गुंतवलेले पैसे किंवा कामाचा मोबदला दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हर्षल यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. या प्रकरणी हर्षल यांच्याशी संपर्क साधणारे व ज्यांच्या बँक खात्यात पैसे वर्ग झाले त्या खातेधारकांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button