पनवेल: मृत वडिलांचे खोटे शपथपत्र बनविल्याप्रकरणी माजी नगरसेवक सुनील बहिरा यांना अटक | पुढारी

पनवेल: मृत वडिलांचे खोटे शपथपत्र बनविल्याप्रकरणी माजी नगरसेवक सुनील बहिरा यांना अटक

पनवेल: पुढारी वृत्तसेवा : वडील मृत असतानादेखील जिवंत असल्याचे भासवून वडिलांच्या नावाने खोटे शपथपत्र बनविल्या प्रकरणी पनवेलमधील  शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक सुनील बहिरा यांना पोलिसांनी आज (दि.२४) अटक केली. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहिरा यांना न्यायालयात हजर केले असता २८ नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली. Sunil Bahira

याबाबत अधिक माहिती अशी की, माजी नगरसेवक सुनील बहिरा यांचे वडील गोविद काथोर बहिरा यांचा १९७७ मध्ये मृत्यू झाला आहे. मात्र, त्याचा मुलगा सुनील बहिरा याने वडील जिवंत असल्याचे दाखवून १९९७ मध्ये स्टॅम्प पेपरच्या माध्यमातून खोटे शपथ पत्र बनवले. आणि त्या शपथपत्राच्या आधारे पनवेल नगर परिषदेकडून बांधकाम परवाना मिळवला. या बाबतची माहिती पनवेल पोलिसांना काही दिवसांपूर्वी मिळाली होती. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करून कागदपत्रांची पडताळणी केली. त्यानंतर गुन्हा दाखल करून बहिरा यांना अटक करण्यात आली. Sunil Bahira

पुढील तपास पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button