अलिबाग; किशोर सुद : 48 वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा सोमवारपासून अलिबागमध्ये सुरू झाली आहे. या स्पर्धेत नवी मुंबई आयुक्तालय, मिरा भाईंदर, ठाणे ग्रामीण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर पोलीस विभागाचे खेळाडू सहभागी झाले आहेत. पहिल्याच दिवशी अॅथलेटिक्स, वेटलिफ्टिंग, पाॅवरलिफ्टींगसह कबड्डीमध्ये रायगड विभागाने चमकदार कामगिरी केली आहे.
रायगड पोलीस विभागातर्फे 48 वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 20 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर रोजी दरम्यान अलिबागमधील सरखेल कान्होजी आंग्रे क्रीडा नगरी, पोलीस मुख्यालय अलिबाग व आर.सी.एस. क्रीडा संकुल, कुरूळ वसाहत, अलिबाग येथे सुरु झाली आहे. स्पर्धेमध्ये कोकण परिक्षेत्रातील एकूण 7 जिल्हयांचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे आपल्या पोलीस घटकाचे प्रतिनिधीत्व करीत असून यात पावशे सातशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बॉक्सिंग, वू-शू, वेट लिफ्टिंग, कुस्ती, कराटे, कबड्डी, हँडबॉल, खो-खो, अॅथलेटिक्स व स्विमिंग असे सात सांघिक व 9 वैयक्तीक खेळ प्रकार आहेत.
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी यजमान रायगड विभागाने चमकदार कामगिरी करीत स्पर्धेवर छाप पाडली आहे. पुरुष गटाच्या फुटबाॅलच्या झालेल्या 6 सामन्यांपैकी रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी विजेते ठरले तर दोन सामने अनिर्णित राहिले. रायगडने पालघर आणि ठाणे या दोन संघांना पराभूत केले.
व्हाॅलीबाॅलच्या 3 सामन्यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि नवी मुंबई विजय झाले. रायगडने पालघरचा पराभव केला. बास्केटबाॅलच्या 3 सामन्यांमध्ये रायगड, नवी मुंबई आणि रत्नागिरी विजेते ठरले. यात रायगडने सिंधुदुर्गचा पराभव केला. खो-खोच्या तीन सामन्यांमध्ये रायगड, नवी मुंबई आणि सिंधुदुर्ग विजयी झाले. यात रायगडने रत्नागिरीचा पराभव केला. कबड्डीच्या 3 सामन्यात रायगड, नवी मुंबई व रत्नागिरी विजेते ठरले. कबड्डीत रायगडने सिंधुदुर्गचा पराभव केला. हॅण्डबाॅलच्या तीन सामन्यात रायगड, नवी मुंबई आणि रत्नागिरी विजेते ठरले. येथे रायगडने पालघरचा पराभव केला.
पुरुष गटाच्या अॅथलेटीक्समध्ये दहा हजार मीटरमध्ये प्रथम नवी मुंबईचे मनीलाल गावीत, द्वितीय रायगडचे प्रदीप गोरे, तृतीय रायगडचे प्रवीण सूर्यवंशी, चतुर्थ पालघरचे दीपक सुजम यांनी यश मिळविले. 110 अडथळा शर्यतीत प्रथम रायगडचे करण पाटील, द्वितीय रत्नागिरीचे रोहित मांगले, तृतीय क्रमांकाचे मानकरी रायगडचे शुभम नांदगावकर ठरले. 1500 मीटर धावणेमध्ये प्रथम सिंधुदुर्गचे वैभव नार्वेकर, द्वितीय रत्नागिरीचे नारायण कावळे, तृतीय रायगडचे अल्फाज झाकीर हुसेन आत्तार आणि चतुर्थ नवी मुंबईचे माधव रवंणदाजे यांनी यश मिळविले. या अॅथलेटीक्सच्या चार प्रकारात रायगडने सर्वाधिक 18 गुण मिळवून अव्वल स्थान पटकाविले. तर नवी मुंबई 11, रत्नागिरी 6, सिंधुदुर्ग 5, ठाणे 2 तर पालघरने 1 गुण मिळविला आहे.
पुरुषांच्या वेटलिफ्टींगमध्ये 55 वजनी गटात प्रथम रायगडचे सागर गुळींग, द्वितीय नवी मुंबईचे शशिकांत कुंभार यशस्वी ठरले. 61 वजनी गटात प्रथम रायगडचे रितेश यादव, द्वितीय पालघरचे अर्जून बारवाल, तृतीय नवी मुंबईचे समीर यादव, 67 वजनी गटात प्रथम नवी मुंबईचे धिरेंद्र यादव, द्वितीय रायगडचे वामन गोरे, तृतीय पालघरचे दत्ता गुरवे, 73 वजनी गटात प्रथम नवी मुंबईचे संजय मोरे, द्वितीय पालघरचे विश्वास सावंत, तृतीय रायगडचे जयेश भोईर, 81 वजनी गटात प्रथम नवी मुंबईचे समीर गाढवे, द्वितीय रायगडचे मनोज हंबीर, तृतीय ठाणे ग्रामीणचे निलेश मोरे, 89 वजनी गटात प्रथम रायगडचे साैरभ पाटील, द्वितीय प्रवीण घोटकर, तृतीय ठाणे ग्रामीणचे स्वप्नील बेलेकर, 96 वजनी गटात प्रथम नवी मुंबईचे तुषार शिंदे, द्वितीय रायगडचे नवनाथ अगम, तृतीय ठाणे ग्रामीणचे राजेश डोगरे, 102 वजनी गटात प्रथम नवी मुंबईचे प्रशांत वाघ, द्वितीय रायगडचे नवनाथ गावडे, तृतीय पालघरचे अवधूत आरते, 109 वजनी गटात प्रथम ठाणे ग्रामीणचे अनिल मढवी, द्वितीय रायगडचे आकाश गोळे, तृतीय पालघरचे रोहित पाटील आणि 109 च्या पुढील वजनी गटात प्रथम रायगडचे प्रमोद पाटील, द्वितीय ठाणे ग्रामीणचे संदीप यादव आणि तृतीय क्रमांकाचे रायगडचे विशाल पवार मानकरी ठरले. यात रायगडने 37 गुण मिळवून अव्वल स्थान मिळविले. नवी मुंबई 32, ठाणे मिरा भाईंदर 11, पालघर 9 तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला शून्य गुण आहेत.
पुरुषांच्याच पाॅवर लिफ्टिंगमध्ये 59 वजनी गटात प्रथम रायगडचे रितेश यादव, द्वितीय पालघरचे विष्णू कोळी ठरले. 66 वजनी गटात प्रथम पालघरचे दत्ता गुरवे, द्वितीय रायगडचे वामन गोरे, 74 वजनी गटात प्रथम ठाणे ग्रामीणचे संतोष पवार, द्वितीय नवी मुंबईचे समीर गाढवे, तृतीय रायगडचे अभिनव पाटील, 83 वजनी गटात प्रथम पालघरचे विश्वास सावंत, द्वितीय रायगडचे विकेंद्र मोकल, 93 वजनी गटात प्रथम ठाणे ग्रामीणचे रामदास खरात, द्वितीय पालघरचे महादेव भंगे, तृतीय रायगडचे ऋषिकांत अगम, 105 वजनी गटात प्रथम रायगडचे आकाश गोळे, द्वितीय पालघरचे सागर इंगळे, तृतीय रायगडचे नवनाथ गावडे, 120 वजनी गटात प्रथम ठाणे ग्रामीणचे अनिल मढवी, द्वितीय रायगडचे विशाल पवार आणि 120 पेक्षा अधिक वजनी गटात प्रथम रायगडचे प्रमोद पाटील आणि द्वितीय क्रमांक संदीप यादव यांनी पटकाविला. पाॅवरलिफ्टींगच्या सात प्रकारात रायगडने 27 गुण, पालघर 19, ठाणे मिरा भाईंदर 18, नवी मुंबई 3 तर रत्नागिरी आणि सिंधुदु्र्गने शून्य गुण मिळविले.
रायगडची महिला गटातील खेळांमध्येही चमकदार कामगिरी झाली आहे. व्हाॅलीबाॅलच्या 3 सामन्यात रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग विजयी झाले आहेत. यात रायगडने पालघरचा पराभव केला. बास्केटबाॅलच्या तीन सामन्यात रायगड, नवी मुंबई, रत्नागिरी विजयी झाले असून रायगडने सिंधुदुर्गचा पराभव केला. खो-खोमध्ये तीन सामन्यात नवी मुंबई, सिंधुदुर्ग विजयी झाले. एका सामन्याचा निर्णय उपलब्ध होऊ शकला नाही. कबड्डीच्या तीन सामन्यात नवी मुंबई, रायगड रत्नागिरीने विजय मिळविला. यात रायगडने सिंधुदुर्गचा पराभव केला.
महिलांच्या अॅथलेटीक्समध्ये 400 मीटरमध्ये प्रथम सिंधुदुर्गची संजीवनी चाैगले, द्वितीय रायगडची वर्षा जगताप, तृतीय रायगडची कोमल गावडे, गोळाफेकमध्ये प्रथम रत्नागिरीची तेजस्विनी जाधव, द्वितीय रायगडची कोमल गावडे, तृतीय नवी मुंबईची स्वाती ठोके, 100 मी. अडथळा शर्यतीत प्रथम रत्नागिरीची शीतल पिंजरे, द्वितीय रायगडची पल्लवी माने, तृतीय पालघरची कविता हाडळ, 1500 मी. धावणेमध्ये प्रथम रायगडची समीना पटेल, द्वितीय रायगडची आरफना मगर, तृतीय रत्नागिरीची दर्शना शिंदे यांनी यश मिळविले. यात रायगडने सर्वाधिक 19 गुण मिळविले. तर रत्नागिरीचे 12, सिंधुदुर्ग 6, नवी मुंबई 3, पालघर 3 आणि ठाणे 0 गुण आहेत.
महिलांच्या वेटलिफ्टींगमध्ये 45 वजनी गटात प्रथम रायगडची वर्षा जगताप, द्वितीय पालघरची संगीता कडू, तृतीय ठाणे ग्रामीणची आनंदी पांचागणे, 49 वजनी गटात प्रथम रायगडची समीना पटेल, द्वितीय ठाणे ग्रामीणची सपना मडके, तृतीय पालघरची प्रिती जाधव, 55 वजनी गटात प्रथम रायगडची पल्लवी माने, द्वितीय रत्नागिरीची पूजा गायकवाड, तृतीय ठाणे ग्रामीणची सुप्रिया पाटील, 59 वजनी गटात प्रथम रायगडची ऋतुजा पाटील, द्वितीय नवी मुंबईची राजश्री बांगर, तृतीय सिंधुदुर्गची सारिका चव्हाण, 64 वजनी गटात प्रथम नवी मुंबईची अर्चना पाटील, द्वितीय पालघरची स्वाती सहानी, तृतीय सिंधुदुर्गची वर्षा मोहिते, 71 वजनी गटात प्रथम नवी मुंबईची प्रणिता कोडलकर, द्वितीय पालघरची रोहिणी बोराडे, तृतीय रायगडची प्रियंका भोगावकर, 76 वजनी गटात प्रथम नवी मुंबईची संगीता राठोड, द्वितीय ठाणे ग्रामीणची आश्विनी भिलोर, तृतीय रायगडची रेश्मा डफळ, 81 वजनी गटात प्रथम रायगडची खतिजा मेहबूब शेख, तृतीय सिंधुदुर्गची तनुजा राऊळ, तृतीय ठाणे ग्रामीणची शुभांगी जगताप व 87 पुढील वजनी गटात प्रथम रायगडची अभियंती मोकल, द्वितीय सिंधुदुर्गची नंदिनी गावकर आणि तृतीय क्रमांक नवी मुंबईची मयुरी खरातने पटकाविला. यातही रायगडने सर्वाधिक 35 गुण मिळवीले. नवी मुंबई 19, सिंधुदुर्ग 13, पालघर 11, ठाणे मीरा भाईंदर 9 आणि रत्नागिरीने 3 गुण मिळविले आहेत.
महिलांच्या पाॅवर लिफ्टींगमध्ये 47 वजनी गटात प्रथम रायगडची वर्षा जगताप, 52 वजनी गटात प्रथम रायगडची समीना पटेल, द्वितीय पालघरची उज्वला मुंढे, 57 वजनी गटात प्रथम रायगडची पल्लवी माने, द्वितीय पालघरची ज्योती जाधव, 63 वजनी गटात प्रथम पालघरची स्वाती सहानी, द्वितीय रायगडची ऋतुजा पाटील, तृतीय पालघरची सीमा काळेल, 69 वजनी गटात प्रथम रायगडची अभियंती मोकल, 76 वजनी गटात प्रथम रायगडची निलीमा गायकवाड, द्वितीय रायगडची रेश्मा डफळ, 84 वजनी गटात प्रथम रायगडची सुनीता आतणे आणि 84 पेक्षा पुढील वजनी गटात प्रथम रायगडची खतीजा मेहबूब शेख, द्वितीय सिंधुदुर्गची नंदिनी गावकर यांनी यश मिळविले. यातही रायगडने 41 गुण मिळवित अव्वल स्थान ठेवले. तर पालघर 12, सिंधुदुर्ग 3 आणि नवी मुंबई, रत्नागिरी, ठाणे मीरा भाईंदर यांच्या नावे शून्य गुण आहेत.
रायगड पोलीस विभागातर्फे आयोजित 48 वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा आैपचारिक उद्घाटन समारंभ आज (22 नोव्हेंबर रोजी) राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सायंकाळी 4 वाजता अलिबागमधील पोलीस मुख्यालय येथील सरखेल कान्होजी आंग्रे क्रीडा नगरीत होणार आहे. यावेळी खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, आमदार जयंत पाटील, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, भरत गोगावले, प्रशांत ठाकूर, रवींद्र पाटील, महेंद्र थोरवे, महेश बालदी, महेंद्र दळवी यांच्यासह जिल्हाधिकारी योगेश म्हसे, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, मधुकर पाण्डेय, कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आदी उपस्थित राहणार आहेत