दुधी भोपळ्याची कोफ्ता करी कशी बनवायची? जाणून घ्या रेसिपी | पुढारी

दुधी भोपळ्याची कोफ्ता करी कशी बनवायची? जाणून घ्या रेसिपी

साहित्य :

1 मध्यम आकाराचा दुधी भोपळा, 1/2 वाटी बेसन, 2 कांदे, 2 टोमॅटो, 6-7 पाकळ्या लसूण, 1 वाटी तेल, 1 चमचा तिखट, मीठ, हळद, जिरे इत्यादी.

कृती

प्रथम भोपळा सोलून घ्या. नंतर त्याला किसणीने किसून घ्या. त्याला पाणी सुटले असेल ते सगळे पिळून काढून घेणे. त्यात बेसन, थोडसं चवीपुरते तिखट, मीठ, हळद आणि हे सगळे नीट मिक्स करून त्याचे पाहिजे त्या आकाराचे गोळे करून घेणे. तेल गरम करून गोळे मंद आचेवर तळून घेणे (मिक्सरमधून पेस्ट केली तरी चालेल).

लसूण ठेचून घेणे. कढईत तेल गरम करून जिरे टाकावे. मग कांदा (पेस्ट) टाकून तो तांबूस झाल्यावर टोमॅटो (पेस्ट) टाकून तो सुटेल तोपयर्र्ंत होऊ द्यावे आणि मग त्यात तिखट, हळद टाकून चवीनुसार मीठ घालावे आणि चांगली उकळी येऊ द्यावी आणि त्यानंतर तळलेले गोळे टाकून परत एक उकळी येऊ द्यावी. गरम गरम पोळी/पराठ्यांसोबत खायला द्यावी.

Back to top button