Rohit Sharma Press Conference : रोहित शर्माचा न्यूझीलंड संघाला इशारा, म्हणाला… | पुढारी

Rohit Sharma Press Conference : रोहित शर्माचा न्यूझीलंड संघाला इशारा, म्हणाला...

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Press Conference : वनडे विश्वचषक स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे. लीग टप्प्यातील सामने संपले आहेत. उपांत्य फेरीचे दोन आणि फायनलचा सामना खेळायचा बाकी आहे. पहिला उपांत्य सामना बुधवारी 15 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार असून यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने असतील. या सामन्यासाठी दोन्ही संघ पूर्णपणे सज्ज झाले आहेत. दरम्यान या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्याने संघाची रणनीती आणि न्यूझीलंड संघावर मोठे विधान केले.

या संवादात रोहितला त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल विचारण्यात आले. यावर उत्तर देताना रोहित म्हणाला, ‘सध्या याबाबत विचार करण्याची वेळ नाही. उपांत्य सामन्यावर लक्ष केंद्रित केले आहे. माझ्या प्रवासाबद्दल, घडलेल्या गोष्टींबद्दल विचार करायला मला आता वेळ नाही. कदाचित 19 नोव्हेंबरनंतर मी याचा विचार करेन. सध्या, फक्त संघासाठी काम करणे हे ध्येय बाळगले आहे. वनडे वर्ल्डकप ही एक हाय-प्रोफाइल टूर्नामेंट आहे. आम्ही भारतीय संघ म्हणून चांगले क्रिकेट खेळण्याचा जीवापाड प्रयत्न करत आहे. आतापर्यंत आम्ही त्याच रणनीतीने खेळलो आहे. आम्हाला फार काही बदलण्याची गरज नाही. विश्वचषकाच्या सुरुवातीला जी मानसिकता होती, तीच मानसिकता घेऊन पुढे जाणार आहे.’ (Rohit Sharma Press Conference)

‘न्यूझीलंड संघ हा सर्वात शिस्तप्रिय’

पत्रकार परिषदेत रोहितला न्यूझीलंडच्या आव्हानाबद्दलही विचारण्यात आले. उत्तर देताना रोहितने आत्मविश्वास दाखवला आणि म्हणाला, ‘न्यूझीलंड संघ हा सर्वात शिस्तप्रिय संघांपैकी एक आहे. आम्ही जेव्हा-जेव्हा त्यांच्या विरुद्ध खेळलो, तेव्हा त्यांच्या शिस्तबद्धतेची जाणीव झाली. ते स्मार्ट क्रिकेट खेळतात. त्यांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांची मानसिकता समजते. ते 2015 पासून सतत सर्व आयसीची टूर्नामेंटच्या सेमीफायनल आणि फायनलमध्ये खेळत आहेत.’ (Rohit Sharma Press Conference)

संघ संयोजनावर रोहित म्हणाला…

सांघिक संयोजनाबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, ‘2011 च्या विश्वचषक स्पर्धेचा मी भाग नव्हतो. त्यावेळी धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जेतेपद पटकावले होते. मी 2015 आणि 2019 संघांचा भाग होतो. कोणता संघ चांगला होता हे सांगणे फार कठीण आहे. 2019 चा संघ 2023 च्या संघापेक्षा चांगला होता असे मी म्हणणार नाही. मी काय म्हणू शकतो की खेळाडूंच्या भूमिका स्पष्ट आहेत, नशीब तुम्हाला साथ देण्याची वेळ आली आहे आणि नशीब शूरांना साथ देते.’

‘सध्याच्या पिढीतील खेळाडूंचे सौंदर्य..’

यंदाच्या भारतीय संघाचे सौंदर्य म्हणजे 1983 चा विश्वचषक जिंकला तेव्हा आमचा जन्मही झाला नव्हता. 2011 मध्ये आम्ही जिंकलो तेव्हा निम्मे खेळाडू खेळतही नव्हते. टीम इंडियाने शेवटचा विश्वचषक कसा जिंकला याबद्दल बोलताना मी त्यांना पाहिलेले नाही. आपण कसे चांगले खेळू शकतो आणि आपण कसे सुधारू शकतो यावर लक्ष केंद्रित केले आहे. सध्याच्या पिढीतील खेळाडूंचे हे सौंदर्य आहे, अशी भावनाही रोहितने व्यक्त केली.

टीम इंडिया विजय रथावर स्वार

टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. टीम इंडियाने साखळी टप्प्यात 9 सामने खेळले आणि सर्व सामने जिंकले. अशा स्थितीत टीम इंडियाला आपला विजयी सिलसिला कायम ठेवाण्यासाठी सज्ज झाला आहे.

हेही वाचा :

Back to top button