Sam Bahadur Song : रुकना नहीं झुकना नहीं…; विकीच्या ‘सॅम बहादुर’ चं पहिलं गाणे रिलीज | पुढारी

Sam Bahadur Song : रुकना नहीं झुकना नहीं...; विकीच्या 'सॅम बहादुर' चं पहिलं गाणे रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा आगामी ‘सॅम बहादूर’ चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात विकी सॅम माणेकशॉची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट देशभक्तीपर आधारित आहे. दरम्यान चित्रपट निर्मात्यांनी त्यातील विकीचा लूक आणि धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला होता. आता या चित्रपटातील देशभक्तीपर आधारित नवं पहिलं गाणे रिलीज ( Sam Bahadur Song ) करण्यात आलं आहे. यामुळे चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

संबंधित बातम्या 

विकी कौशलच्या इन्स्टाग्रामवर आगामी ‘सॅम बहादूर’ चित्रपटातील पहिलं गाणे रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्याचे बोल ‘बढते चलो’ असे आहेत. ट्रेलरप्रमाणे या गाण्यांनाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. हे नवीन गाणे देशभक्तीवर आधारलेले आहे. गाण्यात व्हॅन, युद्धावर जाणारे सैनिक, जंगले, पाण्याचे झरे, फायरिंग, सैनिकाची फौज, यासारख्या अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. व्हायरल झालेल्या गाण्याला ‘रुकना नहीं. झुकना नहीं. #BadhteChalo!, Song out now, listen in!, #Samबहादुर in cinemas 1.12.2023’. अशी कॅप्शन त्यांनी लिहिली आहे.

गाण्याची सुरुवात विकी कौशलच्या भारदस्त आवाजाने होते. ज्यामध्ये तो म्हणतो की, युद्ध लढणे आणि जिंकणे हे माझे काम आहे. यानंतर सॅम माणेकशॉच्या भूमिकेत विकी आपल्या सैनिकी तुकडीकडे जाताना आणि त्यांना प्रेरित करताना दिसतोय. दरम्यान तो सैनिकाच्या टिमकडे पाहून ‘आम्ही या दिवसासाठी तयारी केली आहे, तो दिवस जवळ आला आहे.’ असे म्हणताना दिसतोय. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’,’बजरंग बली की जय’, ‘दुर्गा माता की जय’ यासारख्या घोषणा दिल्या आहेत. गाण्यात पुढे फायरिंग, ॲक्शन सीन आणि मोठा युध्दाचा प्लॅन ठरविणे या गोष्टीही पाहायला मिळतात.

या गाण्याला शंकर महादेवन, विशाल ददलानी आणि दिव्या कुमार यांनी आवाज दिला आहे. गाण्याला संगीत शंकर एहसान लॉय यांनी दिले असून गाण्याचे बोल गुलजार यांनी लिहिले आहेत. ‘बढते चलो’ हे गाणे चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. यामुळे विकीच्या भूमिकेचे चाहत्यांनी भरभरून कौतुक होत आहेत.

‘सॅम बहादूर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. चित्रपटात विकीने मुख्य भूमिका साकारली असून अभिनेत्री सान्या मल्होत्राने त्याच्या पत्नी ‘सिलू’ ची भूमिका साकारली आहे. फातिमा सना शेखने चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. ( Sam Bahadur Song ) हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

Back to top button