Jhanak Series : मोठी स्वप्न साकारायची होती पण…; हिबा नवाबची एक वेगळी कहाणी

Jhanak Series
Jhanak Series
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावर 'झनक' ( Jhanak Series ) ही नवी मालिका नव्याने दाखल होत आहे. या मालिकेत डोळ्यांत असणारी आशा आणि उरात स्वप्ने बाळगणाऱ्या एका युवतीची कहाणी दाखवण्यात आली आहे. परंतु, तिच्या आयुष्यात अनपेक्षित प्रसंग येतात. हिबा नवाब ही अभिनेत्री या मालिकेत 'झनक'ची मुख्य भूमिका साकारणार आहे. कृशल आहुजा उर्फ अनिरुद्ध हा मुख्य नायकाच्या भूमिकेत असेल तर चांदनी शर्मा 'अर्शी' ची भूमिका साकारणार आहे.

संबंधित बातम्या 

'झनक' ( Jhanak Series ) मालिकेत अशा एका युवतीची कहाणी कथन केली आहे, जी गरिबीत मोठी होते आणि नृत्यांगना बनण्याची आकांक्षा बाळगते. तिच्या आकांक्षा साध्य करण्यासाठी झनक सर्व अडथळ्यांवर मात करण्याचा निश्चय करते खरी, पण जेव्हा तिच्या कुटुंबावर एक शोकांतिका ओढावते तेव्हा तिच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होते. या मालिकेतील झनकच्या आयुष्यात होणार्‍या भावनिक उलथापालथ चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

फिनिक्स पक्ष्याप्रमाणे ती शून्यातून विश्व कसे निर्माण करते, याची कथा या मालिकेत उलगडली जाणार आहे. झनक, अनिरुद्ध आणि अर्शी यांच्या नातेसंबंधांचा हृदयस्पर्शी प्रवास आणि दुरावलेल्या नात्यांचा त्यांनी केलेला सामना हे पाहणे रंजक असणार आहे.

झनकची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री हिबा नवाबने याविषयी म्हणाली की, 'मी 'झनक' मालिकेचा भाग होण्यास अतिशय उत्सुक आहे आणि या मालिकेत मी प्रमुख भूमिका साकारणार आहे. माझ्यासाठी हे सारे थरारक आहे. 'झनक' काश्मीरची आहे, तिला नृत्यांगना बनायचे आहे आणि तिचे कुटुंबावर अतिशय प्रेम आहे. स्वत:चे नशीब बदलणे आणि मनाची इच्छा पूर्ण करणे हे झनकचे ध्येय आहे. मी झनकच्या व्यक्तिरेखेशी- विशेषत: तिचे तिच्या आईसोबत असलेल्या नात्याशी साधर्म्य साधू शकते. मालिकेत दिसणारी मी आणि प्रत्यक्षातील मी सारखीच आहे. झनकची व्यक्तिरेखा साकारताना मला अनेक गोष्टी शिकायला मिळतील आणि मी त्याची वाट पाहात आहे.' यामुळे लीना गंगोपाध्याय निर्मित 'झनक' मालिकेसाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by HIBA NAWAB (@hibanawab)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news