Diwali Makyacha Chivda Recipe : दिवाळीत फराळासोबत बनवा कुरकुरीत – खमंग मक्याचा चिवडा | पुढारी

Diwali Makyacha Chivda Recipe : दिवाळीत फराळासोबत बनवा कुरकुरीत - खमंग मक्याचा चिवडा

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळीच्या धामधूमीला सुरूवात झाली असून महिला वर्गाची नटण्या- मुरडण्यांसोबत फराळ बनवण्यासाठी लगबग सुरू झाली. नुकत्याच सर्वाचा आवडता सण म्हणजे, दिवाळी आलीय. दिवाळी म्हटलं की, घरात नवचैतन्य आणण्यासाठी आकर्षण दिव्याची आणि वेगवेगळ्या रांगोळीची आरास केली जाते. या काळात कुटूंबात चैतन्याच्या वातावरणासोबत पै-पाहूण्यांची रेलचेल पाहायला मिळते. ( Diwali Makyacha Chivda Recipe )

लहानापासून ते मोठ्यापर्यत चिवडा, करंजी, चकली, चिरोटे, मसाला वडी, बाकर वडी, बुंदीचे लाडू, रव्याचे लाडू, बेसनचे लाडू, शंकरपाळी या पदार्थाची जणू मेजवाणीच असते. दिवाळीच्या फराळामधील प्रत्येक पदार्थाची आवडीने चव चाखली जाते. दरम्यान नेहमीचा चिवडा तर प्रत्येक घरात पाहायला मिळतोच. यासोबतच जर कुरकुरीत आणि खंमग मक्याचा चिवडा असेल तर कोणाला आवडणार नाही. जाणून घ्या त्याची रेसीपी….( Diwali Makyacha Chivda Recipe )

No Image

Recipe By अनुराधा कोरवी

Course: गोड- तिखट Cusine: महाराष्ट्रीयन Difficulty: : सोपं

Servings

१० minutes

Preparing Time

१० minutes

Cooking Time

१० minutes

Calories

kcal

INGREDIENTS

  1. मक्याचे फ्लेक्स- २ वाटी

  2. कडीपत्ता- १०-१२ पाने

  3. शेंगदाणे- अर्धा कप

  4. काजूच्या बिया- १५-२०

  5. लाल तिखट- अर्धा चमचा

  6. हिरवी मिरची- एक

  7. चाट मसाला- अर्धा चमचा

  8. पीटी साखर- एक चमचा

  9. चवीनुसार मीठ

  10. तळण्यासाठी तेल

DIRECTION

  1. गॅसवरील कढाईत तेल गरम करून त्यात मक्याचे फ्लेक्स तळून घ्यावेत.

  2. तेलात मक्याचे फ्लेक्स चांगले फुलल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यावे

  3. यानंतर त्याच तेलात अर्धा वाटी शेंगदाणे तळून मक्याचे फ्लेक्सवर घालावे.

  4. १५ ते २० काजूच्या बिया तेलात तळून त्यावर घालावे.

  5. एका हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे आणि कडीपत्ताची १० ते १२ पाने स्वच्छ धुवून एका गाळणीच्या मदतीने तळून घ्यावे.

  6. वरील सर्व मिश्रण एका मोठ्या पसरट भाड्यात काढुन घ्यावे.

  7. या मिश्रणात लाल तिखट, हिरवी मिरची, सेंधन मीट किंवा चाट मसाला, चवीनुसार मीट, पिठी साखर घालून एकत्रित मिक्स करावे.

  8. यानंतर यंदाच्या दिवाळी तयार होईल कुरकुरीत - खंमग मक्याचा चिवडा.

NOTES

  1. हिरवी मिरची किंवा लाल तिखट यापैकी तुम्हाला जे आवडेल ते वापरले तरी चालते. वरील साहित्याचे प्रमाण तुम्हच्या आवडीप्रमाणे कमी- जास्त करू शकता. यात तुम्हच्या आवडीप्रमाणे मोठी किंवा बारीक शेव घालू शकता.

Back to top button