शिवाली परब ‘मासोळी ठुमकेवाली’ म्युझिक व्हिडिओ पाहिला का? | पुढारी

शिवाली परब 'मासोळी ठुमकेवाली' म्युझिक व्हिडिओ पाहिला का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : सातत्याने दर्जेदार म्युझिक व्हिडिओ सादर करणाऱ्या सप्तसूर म्युझिकतर्फे ‘मासोळी ठुमकेवाली’ हा नवा म्युझिक व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे. अभिनेत्री शिवाली परब आणि अभिजित अमकर यांची जोडी या गाण्यात दिसणार आहे. ताल धरायला लावणारं हे गाणं सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या 

साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांच्या सप्तसूर म्युझिकची निर्मिती असलेल्या ‘मासोळी ठुमकेवाली’ या म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन आणि नृत्य दिग्दर्शन कृतिक माझिरे यांनी केलं आहे. हर्ष करण आदित्य (त्रिनिती ब्रोस) यांच्या शब्दांना हर्षवर्धन वावरे, करण वावरे, आदित्य पाटेकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. कस्तुरी वावरे, आदित्य पाटेकर यांनी हे गाणं गायिलं आहे. रोहन कंटक, निखिल वराडकर यांनी छायांकन केलं आहे. या गाण्यात शिवाली परब आणि अभिजित अमकर हे मराठी चित्रपट क्षेत्रातील लोकप्रिय कलावंत आहेत. अंकित शिंदे आणि दिव्या घाग यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.

मराठी गाण्यांमध्ये कोळी गीतांचं वेगळंच महत्त्व आहे. अनेक कोळीगीतं आजही संगीतप्रेमींच्या तोंडी असतात. त्यात आता ‘आली हो मासोळी ठुमकेवाली’ असे शब्द असलेल्या ‘मासोळी ठुमकेवाली’ या गाण्याची भर पडणार आहे. उत्तम शब्द असलेलं हे गाणं चाहत्यांना ताल धरायला लावणार आहे.

Back to top button