Crime News : औरंगजेबाचे स्टेटस ठेवणार्‍या दोघांवर मंचर ठाण्यात गुन्हा | पुढारी

Crime News : औरंगजेबाचे स्टेटस ठेवणार्‍या दोघांवर मंचर ठाण्यात गुन्हा

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  इंस्टाग्रामवर औरंगजेबाचे स्टोरी स्टेटस ठेवल्याप्रकरणी अरबाज अब्बास मोमीन व साहिल शेख या दोघांवर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी अविनाश दळवी
यांनी दिली. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाज अब्बास मोमीन व साहिल शेख यांनी शुक्रवारी (दि. 3) इंस्टाग्रामवर ‘किंग ऑफ हिंदुस्तान अबुल मुजाफर मुही उद दीन मोहम्मद औरंगजेब आलमगिर’ असे लिहून त्याखाली औरंगजेबाचा फोटो ठेवून त्याखाली स्टोरी ठेवली.

तसेच 16 सेकंदांचा औरंगजेबाचा व्हिडिओ तयार करून ‘नाम बदलने से इतिहास नही बदलता’ असा मजकूर ठेवला. तो इतर लोकांना पाठवून लोकांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केला. सध्या सर्वत्र दिवाळीची तयारी सुरू आहे. या काळात वरीलप्रमाणे कृत्य केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मंचर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष साळुंके तपास करीत आहेत.

Back to top button