अल कादी प्रमाणेच हमासच्‍या प्रत्‍येक दहशतवाद्याचा अंत निश्‍चित : इस्‍त्रायलचा इशारा | पुढारी

अल कादी प्रमाणेच हमासच्‍या प्रत्‍येक दहशतवाद्याचा अंत निश्‍चित : इस्‍त्रायलचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हमास दहशतवादी संघटनेचा म्‍होरक्‍या अल कादी प्रमाणेच आता हमासच्‍या प्रत्‍येक दहशतवाद्याचा अंत होईल, असा इशारा इस्‍त्रायलच्‍या संरक्षण मंत्रालयाने दिला आहे. ( Israel Fresh Warning Hamas )

इस्रायल संरक्षण विभागाने (आयडीएफ) म्‍हटले आहे की, दहशतवादी अली कादीने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये नागरिकांची अमानुष, रानटी हत्याकांड घडवून आणले होते. आम्ही त्‍याचा खात्‍मा केला आहे. आता त्‍याच्‍या प्रमाणेच हमासच्‍या प्रत्‍येक दहशतवाद्यांचा अंत निश्‍चित आहे. दरम्‍यान, अमेरिकेचे संरक्षण मंत्री इस्रायलला पोहोचले आहेत. त्यांनी आपल्या इस्रायलमधील अधिकार्‍यांची भेट घेतली. इस्रायलने गाझा पट्टीच्या सीमेवर रणगाडे तैनात केले आहेत आहेत. गाझामध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांनी लवकरात लवकर दुसऱ्या ठिकाणी स्‍थलांतरीत व्‍हावे, असा इशारा दिला आहे.

 

Back to top button