वळसे पाटलांमुळे यांचे अस्तित्व : आ. मोहिते पाटील | पुढारी

वळसे पाटलांमुळे यांचे अस्तित्व : आ. मोहिते पाटील

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ‘माझे विरोधक म्हणून ज्यांना तालुक्यात नेहमी छुपी ताकद दिली, ते आज शरद पवार गटात सामील झाले आहेत. त्यांनी सहकार्य केले नसते तर त्यांचे तालुक्यात अस्तित्व उरले नसते. ज्यांचा परिवार अजित किंवा शरद पवारांचा केव्हाही झाला नाही, ज्यांना आपला पक्ष कधीच उघडपणे सांगता आला नाही असे आता शरद पवार गटात सामील झाले आहेत. त्यांच्या जाण्याला माझ्या शुभेच्छा,’ अशा शब्दांत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शरद पवार गटाकडे गेलेल्या तालुक्यातील विरोधकांना सुनावले.

शिवाय त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा तो वळसे पाटील यांनी घ्यावा. असे सांगत राजकारणाचा चेंडू आमदार मोहिते पाटील यांनी मंत्री वळसे पाटील यांच्या गोलमधे टोलविला. पत्रकारांशी बोलताना आ. दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांची निवड न्यायालयाने अवैध ठरवली आहे. एका संचालकांकडे संस्थेचे अनधिकृतपणे चार कोटी रुपये काही वर्षे असल्याचा आरोप मोहिते पाटील यांनी केला. जे गेले ते माझे कधीच नव्हते. त्यांच्या वेगळा निर्णय घेण्याने मला काहीही फरक पडत नाही. पण, वेळ आल्यावर यांची सगळी कारस्थाने जनतेसमोर आणू, असेही मोहिते पाटील यांनी ठणकावून सांगितले.

Back to top button