व्हिएतनाममध्‍ये अग्‍नितांडव, ५० हून अधिक जणांचा हाेरपळून मृत्यू | पुढारी

व्हिएतनाममध्‍ये अग्‍नितांडव, ५० हून अधिक जणांचा हाेरपळून मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : व्हिएतनाममधील हनोई येथे एका नऊ मजली इमारतीला लागलेल्या आगीत ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, असे वृत्त असे वृत्त दैनिक न्यूयॉर्क टाईम्सने स्‍थानिक माध्यमांच्या हवाल्याने दिले आहे. दुर्घटनेचे कारण अस्पष्ट असून, बचावकार्य सुरू आहे.

व्हिएतनामची राजधानी हनोई येथे मंगळवारी रात्री साडेअकराच्‍या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) आग लागली. रात्रीची वेळ असल्‍याने बहुतांश रहिवासी आपल्‍या घरी होते. अपार्टमेंट कॉम्प्लेक्स हे अरुंद गल्लीमध्ये असल्‍याने अग्निशमन दलाच्‍या जवानांना घटनास्‍थळी पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. या अपार्टमेंटमध्‍ये ४५ फ्‍लॅट आहेत. इमारतीपासून 300 ते 400 मीटर अंतरावर अग्निशमन दलाच्या गाड्या उभ्या कराव्या लागल्या. त्‍यामुळे आग विझविण्‍यात अडचणी आल्‍याचे स्‍थानिक माध्‍यमांनी म्‍हटले आहे.

व्हिएतनामच्या डॅन ट्राय वृत्तपत्राने आज (दि. १३) सकाळी दिलेल्या वृत्तानुसार, स्‍थानिक अधिकाऱ्यांनी भीषण आगीत मृत्‍यूमुखी पडलेल्‍या आकड्याची  पुष्टी केली आहे. आगीनंतर रुग्णालयात दाखल झालेल्या अनेकांचा मृत्यू झाला आहे, असे या वृत्तपत्राने म्हटले आहे.

 

 

Back to top button