दहशतवादासाठी इसिसचा तरुणाईला फास | पुढारी

दहशतवादासाठी इसिसचा तरुणाईला फास

महेंद्र कांबळे / दिनेश गुप्ता

पुणे : राज्यात दहशतवादी कारवाया करण्याच्या गैरहेतुने इसिसने आपले लक्ष तरुणाईकडे केंद्रित केले आहे. हे इसिसने मागील काही महिन्यात केलेल्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. त्यांनी आपला स्लीपरसेल अ‍ॅक्टीव्ह करण्यासाठी उच्चशिक्षीत तरुणाईकडे लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत पकडण्यात आलेल्यांमध्ये तरुणांचाच मोठ्या प्रमाणावर आहे. दहशतवादासाठी इसिसने तरुणाईभोवती फास लावल्याला कारवाईवरून स्पष्टता मिळत आहे. त्यामुळे इसिसची पाळेमुळे खोडून काढण्याचे आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे.
राजस्थान येथील स्फोटके ुन्ह्यात पुणे पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना ताब्यात घेतली होते. मात्र त्यातील एक दहशातवादी कारवाई दरम्यान पळून गेला.

परंतु, पोलिसांच्या ताब्यात असलेले मोहम्मद खान, आणि मोहम्मद साकी यांना अटक झाली. त्याच्याकडील तपासात धक्कादायक खुलासे झाले. त्यांनी जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या घेतल्याचे निष्पन्न झाले. पुढे गुन्ह्याची व्याप्ती पाहता महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) ने गुन्ह्याचा तपास आपल्याकडे घेतला. दहशतवादी अटक केल्यापासून तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) पुण्यातील या गुन्ह्यात लक्ष ठेवुन होती. एटीएसकडून जसजसा गुन्ह्यात तपास होत होता तसतसे नवनवीन खुलासे यामध्ये झाले. ज्या ठिकाणी दहशतवादी राहण्यास होते त्यांना आसरा देणार्‍याला अब्दुल दस्तगीर पठाणला एटीएसने अटक केली. पुढे त्यांना आर्थिक रसद पुरविणार्‍या व इंजिनीअर असलेल्या समिब काझीला रत्नागिरी येथून बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्याकडील तपासामध्ये धक्कादायक खुलासा होऊन इसिसबरोबर असलेले कनेक्शन खर्‍या अर्थाने समोर आले.

आयईडी, बॉम्ब बनविण्यात माहिर असलेल्या संपर्कात पुण्यात पकडलेले दोघे दहशतवादी संपर्कात आल्याचे व त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. एटीएसने याप्रकरणात इसिस प्रकरणात पकडलेल्या जुल्फीकार बडोदावाला याला अटक केली. एटीएसच्या तपासादरम्यान आरोपींचा देशात विविध ठिकाणी मोठ्या घातपाताचा कटही या निमित्ताने उघड झाला. मात्र गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने एटीएसकडून एनआयएने गुन्हा आपल्या ताब्यात घेत गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. त्यांच्याकडील तपासाही प्रगती पथावर असून त्यांनी नाचन नावाच्या एकाला बॉम्ब बनविण्यात, इम्प्रोव्हाईज डिवाईस बनविण्याशी संबंधावरून शनिवारी अटक केली.

गुन्हयात इसिसचा स्लिपरसेल अ‍ॅक्टीव्ह झाल्याबाबत एनआयएकडून अधिक स्पष्टता
एनआयएने केलेल्या तपासात शामिल नाचनचा सहभाग हा बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण आणि देशात घातपाती कारवाया घडवून आणण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या आइडीच्या स्फोटाच्या चाचण्यामध्ये होता. तो इतर पाच जणांच्या बरोबर मिळून हे काम करत होता. शामिल हा इसिसच्या स्लिपरसेल मोड्युलचा सदस्य असल्याबरोबर कोंढव्यातील घरातून हा सर्व प्रकार सुरू होता. त्यांनी मागी वर्षी बॉम्ब व आईडी बनविण्याचे प्रशिक्षणही दिल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांनी नियंत्रीत स्फोट घडवून आणले यावर एनआयएने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे राज्यात इसिसचा स्लिपरसेल अ‍ॅक्टीव्ह झाला आहे.

मुंबई-पुणे-ठाण्यासह राज्यात इसिसकडून मोर्चेबांधणी
इसिसचे जाळे मुंबई-पुणे-ठाण्यासह राज्यासह देशात पसरले आहे त्या दृष्टीने त्यांनी मोर्चे बांधणी केल्याचेही विविध तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईवरून निष्पन्न झाले आहे. एनआयएने 3 जुलै 2023 रोजी मुंबई, ठाणे आणि इतर परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध घेतल्यानंतर चौघांना अटक केली होती. मुंबईतून तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातून जुबेर नूर मोहम्मद ऊर्फ शेख अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक करण्यात आली होती. तर नुकताच एनआयएने आयसिसच्या महाराष्ट्र गटाचा (मोड्युल) डॉ. अदनान अली सरकार (वय 43) त्यानंतर भिवंडीतून आकिफ नाचन याला अटक केली होती. तरुणांची माथी भडकवून त्यांना आयसिसच्या दहशतवादी कारवायांमध्ये सामील करून दहशतवाद्यांचा कट होता. देशाच्या एकात्मतेला, सुरक्षेला, अखंडतेला तसेच सार्वभौमत्वाला धोका पोहचविण्याचा त्यांचा मानस होता.

तसेच महाराष्ट्रातील स्लिपर सेल वाढविण्याचेदेखील त्यांचे काम सुरू होते. बडोदावाला हा तरुण शस्त्र बनविण्याचे तसेच इम्प्रोव्हाईज एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडीज) तसेच हातबॉम्ब बनविण्याचे तसेच पिस्तूल बनविण्याचे प्रशिक्षण देत असल्याचे तपासात समोर आले होते. त्यानेच कोथरूड येथून पकडलेल्या दोघांना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिले असल्याचेही एनआयएने त्यांच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले होते. तर पुण्यातील दशतवाद्यांच्या संपर्कावरून एनआयएने पुण्यातील गुन्ह्यात शामिल साकिब नाचन याला अटक केली आहे. त्याने देखील दहशतवादी कृत्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचा देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा : 

Shravan Upvasache Dhirde : खिचडी नकोय! मग मस्त उपवासाचे खमंग धिरडे करा

देशी अंडी विकून झाला लखपती! पुण्याच्या सौरभचा थक्क करणारा प्रवास

Back to top button