Amboli Festival: आंबोलीत शनिवारीपासून वर्षा पर्यटन महोत्सव | पुढारी

Amboli Festival: आंबोलीत शनिवारीपासून वर्षा पर्यटन महोत्सव

ओरोस, पुढारी वृत्तसेवा: पावसाळी पर्यटनाच्या दृष्टीने राजस्थान, गुजरात, केरळ या राज्यासह महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली येथे वर्षा पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले आहे. दि. १२ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या दरम्यानच्या महोत्सवाला देशी, विदेशातून सुमारे ५ हजारांहून अधिक पर्यटक भेट देणार आहेत. या निमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी यांनी आज (दि. ११) पत्रकार परिषदेत दिली. Amboli Festival

पर्यटकांच्या वाढीसाठी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने पर्यटन संचालनाच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. १२ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या कालावधीत कोकणातील सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे. दशावतार, फुगडी, कळसुत्री, बावले चांगभलं, धनगरी नृत्य, शहीद हवालदार पांडुरंग गावडे यांच्या स्मारकाजवळ माजी सैनिकांचे संचालन, साहसी पर्यटन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. Amboli Festival

जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल म्हणाले की, आंबोली येथे अनेक पर्यटक येतात, सुरक्षितेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनामार्फत सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या वर्षा पर्यटनाच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अनुचित प्रकार रोखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

पर्यटन उपसंचालक हनुमंत हेडे म्हणाले की, महोत्सवाच्या माध्यमातून सिंधुदुर्गचे नाव देश- विदेशात पोहोचणार आहे. विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.महिलांसाठी खास ‘आई’ हा अॅडव्हान्स कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. १५ लाखांपर्यंत कर्ज पुरवठा देण्याचा उपक्रम खास महिलांसाठी राबविला जात आहे. यावळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छींद्र सुकटे, पर्यटन उपसंचालक हनमंत हेडे, जिल्ह नियोजन अधिकारी पवार आदींसह उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा हा देशात पर्यटन जिल्हा म्हणून घोषित आहे. जिल्ह्यात समुद्रकिनारे, मंदिरे तसेच विविधतेने नटलेली ऐतिहासिक अशी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. आंबोली येथे प्रति महाबळेश्वर असे ठिकाण आहे. धबधब्यामुळे प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी हजारो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. समुद्रकिनारे, खळखळते झरे, डोंगरदऱ्या, नारळ, पोपळीच्या बागा, काजू, नारळ शेती, चौमोळी छपराची घरे, उकडीचे मोदक, आंबापोळी, सुरमई, पापलेट, वडे मटण, कोंबडी वडे, कोकम सरबत याची सर्वांना उत्सुकता असते.

हेही वाचा

Back to top button