Driverless car : बंगळुरात धावली ड्रायव्हरविना कार! | पुढारी

Driverless car : बंगळुरात धावली ड्रायव्हरविना कार!

बंगळूर : हॉलीवूडच्या एखाद्या सायन्स-फिक्शन चित्रपटात शोभून दिसेल अशी एक हाय-फाय कार बंगळुरातील रस्त्यावरून धावली आणि येणार्‍या जाणार्‍या नागरिकांचे त्याकडे लक्ष गेले नसते तरच नवल होते. अनिरुद्ध रविशंकर या युजरने या कारचा व्हिडीओ टि्वटरवर अपलोड केला असून आपण बंगळूरमध्ये ही कार पाहिल्याचा त्याने दावा केला आहे.

त्याने टि्वटरवर हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर पहिल्या काही मिनिटांतच त्याला 12 हजारपेक्षा अधिक लाईक्स मिळाले होते. शिवाय, तो व्हिडीओ री-टि्वटही केला गेला. सोशल मीडिया युजर्सच्या नंतरही त्यावर उड्या पडतच राहिल्या. ही भारतीय सायबरट्रक आहे का, असा प्रश्न एका युजरने विचारला तर एका युजरने बंगळुरातील 27 व्या मेन रोड लेनवर या कारची चाचणी सुरू असल्याची माहिती दिली. एका युजरने त्याही पुढे जात ही झेड पॉड कार असल्याचे सांगितले.

झेड पॉड ही मायनस झिरोने निर्मिलेली स्वयंचलित कार आहे. मायनस झिरो ही बंगळुरातील स्वायत्त स्वरूपातील मोबिलिटी स्टार्टअप असून या कारला पारंपरिक स्टिअरिंग व्हील नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. स्टिअरिंगऐवजी हाय-रिझॉल्युशनचे कॅमेरे बसवले गेले असून ड्रायव्हिंग कंडिशन्स व ट्रॅफिकची त्यात नोंद होते. जेणेकरुन रोड नेव्हिगेट करणे अधिक सुलभ व्हावे, अशी या कारची रचना आहे.

संबंधित बातम्या
Back to top button