मराठा आरक्षणासाठी दिल्लीत अखिल भारतीय मराठा महासंघाचे आंदोलन | पुढारी

मराठा आरक्षणासाठी दिल्लीत अखिल भारतीय मराठा महासंघाचे आंदोलन

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आरक्षणाची मर्यादा वाढविल्या शिवाय मराठा समाजाला आणि देशातील इतर समाजाला न्याय मिळणार नाही. केंद्र सरकारने त्यामुळे लोकसभा, राज्यसभेच्या पटलावर प्रलंबित असलेले आरक्षण मर्यादा वाढीचे विधेयक तात्काळ मंजुर करीत सर्वांना न्याय द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. २५) राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर महासंघाच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी दिली.

आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी आवश्यक असलेले विधेयक लोकसभा तसेच राज्यसभेच्या पटलावर सध्या प्रलंबीत आहे. या विधेयकाच्या मंजुरीसाठी केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात त्यावर विशेष चर्चा घडवून आणावी,अशी मागणी करीत देशातील सर्वच राजकीय पक्षांनी त्यांची आरक्षण मर्यादा वाढीची भूमिका स्पष्ट करणे गरजेचे असल्याचे आरक्षणाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील म्हणाले.

Back to top button