Hand Chopping Case: केरळमध्‍ये प्राध्यापकांवर प्राणघातक हल्‍ला, NIA न्यायालयाने ६ जणांना ठरवले दोषी | पुढारी

Hand Chopping Case: केरळमध्‍ये प्राध्यापकांवर प्राणघातक हल्‍ला, NIA न्यायालयाने ६ जणांना ठरवले दोषी

पुढारी ऑनलाईन: केरळमधील विशेष ‘एनआयए’ न्यायालयाने प्राध्यापकाचा हात कापल्याप्रकरणी आज (दि.१२ जुलै) सहा जणांना दोषी (Professor Hand Chopping Case) ठरवले. न्यायालयाने दोषी ठरवलेले सर्व आरोपी हे बंदी घालण्यात आलेल्या कट्टरपंथी इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे (PFI) सदस्य आहेत.

विशेष ‘एनआयए’ न्यायालयाचे न्यायाधीश अनिल के भास्कर यांनी या प्रकरणाची सुनावणी घेतली. न्यायालयाने आरोपींना भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत खुनाचा प्रयत्न, कट रचणे आणि इतर अनेक गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले आहे. एका प्रश्नपत्रिकेतील प्रश्‍नाच्‍या माध्‍यमातून धर्माचा अपमान केल्याच्या समजातून आरोपींनी २०१० मध्‍ये प्रोफेसर टी जे जोसेफ यांचा हात कापला हाेता. (Professor Hand Chopping Case)

Professor Hand Chopping Case: काय आहे संपूर्ण प्रकरण?

केरळमधील न्यूमन कॉलेजचे प्रोफेसर टी जे जोसेफ हे त्यांच्या कुटूंबासह चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेले होते. घरी परतत असताना सात जणांच्या टोळक्याने प्राध्यापकाला वाहनातून बाहेर काढले. त्‍यांच्‍यावर प्राणघातक हल्ला करत त्यांचा उजवा हात तोडला होता. दरम्यान, हे कृत्य PFI च्या कार्यकर्त्यांनी केले असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा सुरुवातीला तपास करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूमन कॉलेजमध्ये बीकॉम सेमिस्टर परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत अपमानास्पद धार्मिक शेरेबाजी केल्याप्रकरणी आरोपींना जोसेफला (Professor Hand Chopping Case) यांना मारायचे होते, असे उघड झाले.

खटल्याच्या पहिल्या टप्प्यात 31 आरोपींना सुनावणीला सामोरे जावे लागले होते. यामधील ने ६ जणांना दोषी ठरवण्यात आले असून, अन्य पाच जणांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. या घटनेनंतर न्यायालयाने एप्रिल २०१५ मध्ये १० आरोपींना स्फोटक पदार्थ कायदा आणि आयपीसी अंतर्गत दोषी ठरवले होते. त्याचवेळी गुन्हेगारांना आश्रय दिल्याप्रकरणी आणखी तिघांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणातील अन्य १८ जणांची निर्दोष मुक्तता केली होती.

हेही वाचा:

Back to top button