Karan Deol Wedding : सनी देओलचा मुलगा करण- दृशा आचार्य अडकले विवाह बंधनात
![Karan Deol Wedding](https://d2n2y7fp2ncdvv.cloudfront.net/files/2023/06/18161440/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%93%E0%A4%B2.jpg)
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल सिने-दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या नातीसोबत म्हणजेच दृशा आचार्यसोबत विवाह बंधनात ( Karan Deol Wedding ) अडकला. या शाही विवाह सोहळा मुंबईत आज रविवारी (दि.१८) रोजी मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. या विवाह सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
करण देओल त्याची लॉग टाईम गर्लफ्रेंड दृशा आचार्य नुकतचे लग्न बंधनात अडकले. यावेळी दृशा नक्षीदार लाल कलरच्या लेंहग्यात तर करण शेरवानीत हॅडसम दिसला. मुंबईतील ताज लॅन्ड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये शाही विवाहसोहळा पार पडला. यासोहळ्यात खास करून बॉलिवूड अभिनेता सनी देओल, बॉबी देओल, धर्मेंद्र, अभय देओल , राजवीर देओल यांनी उपस्थिती लावली होती. विवाह सोहळ्यातील पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. क्यूट वधू- वरांची जोडी लग्न मंडपात दिसली.
![Karan Deol Wedding](https://d2n2y7fp2ncdvv.cloudfront.net/files/2023/06/18161440/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%93%E0%A4%B2.jpg)
हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कपलवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. याआधी करणचे आजोबा धर्मेद्र यांनी एका गाण्यावर धमाकेदार परफार्म केला होता. धर्मेद्र यांचा जान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
(video : viralbhayani instagram वरून साभार)
हेही वाचा :