Ashish Deshmukh : आशिष देशमुख यांची घरवापसी; ‘या’ तारखेला होणार भाजपात पुन्हा पक्षप्रवेश | पुढारी

Ashish Deshmukh : आशिष देशमुख यांची घरवापसी; 'या' तारखेला होणार भाजपात पुन्हा पक्षप्रवेश

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आलेले माजी आमदार डॉ. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) हे पुन्हा भाजपवासी होणार आहेत. येत्या 18 जून रोजी कोराडी येथे आयोजित एका कार्यक्रमात देशमुख यांची भाजपात घरवापसी होणार आहे.

कोराडी येथील नैवेद्यम नॉर्थस्टार येथे रविवारी सकाळी 10 वाजता आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांच्या उपस्थितीत आशिष देशमुख भाजपमध्ये पुन्हा प्रवेश घेणार आहेत. यापूर्वी काटोल मतदारसंघात काका माजी मंत्री अनिल देशमुख (Ashish Deshmukh) यांचा प्रभाव करीत ते विधानसभेत पोहचले होते.पक्ष प्रवेश प्रसंगी नागपूर ग्रामीण भाजपचे अध्यक्ष अरविंद गजभिये, शहर अध्यक्ष आ प्रवीण दटके यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

अलिकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आशिष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. तेव्हापासूनच देशमुख यांच्या भाजपवापसीची चर्चा सुरू झाली होती. देशमुख यांनी थेट काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर वेळोवेळी ओबीसी हिताचे निमित्त साधत निशाणा साधला होता. त्यापायी काँग्रेसने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. सावनेर, काटोल मतदारसंघातुन ते भाजपच्या तिकिटाचे दावेदार आहेत.

Back to top button