कॅनडाच्या वणव्याचा परिणाम न्यूयॉर्कवर; आकाश झाले नारिंगी | पुढारी

कॅनडाच्या वणव्याचा परिणाम न्यूयॉर्कवर; आकाश झाले नारिंगी

न्यूयॉर्क; वृत्तसंस्था :  कॅनडात पेटलेल्या वणव्याने निर्माण झालेल्या धुराने थेट न्यूयॉर्कपर्यंत मजल मारली असून यामुळे जगातील सर्वात घातक पातळीवर न्यूयॉर्कचे हवेचे प्रदूषण पोहोचले आहे. धुरामुळे आकाश पूर्ण नारिंगी झाले असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कॅनडात गेल्या आठवड्यापासून वणवे भडकले असून त्याचा घातक धूर आसमंतात पसरला आहे. हा धूर आता थेट न्यूयॉर्कमध्ये पोहोचला आहे. न्यूयॉर्कच्या हवेने प्रदूषणाची घातक पातळी गाठली असून दिवसाही अंधारून आल्यासारखे वातावरण तयार झाले आहे. लख्ख सूर्यप्रकाश असतानाही न्यूयॉर्कचे आकाश या धुरातून येणार्‍या प्रकाशामुळे नारिंगी बनले आहे. तसेच हवेत जळका वास सर्वत्र पसरला असून प्रशासनाने नागरिकांना गरज असेल तरच बाहेर पडण्याचा व बाहेर पडताना मास्क वापरण्याचा इशारा दिला आहे. वृद्ध, श्वसनाचा आजार असलेल्या व्यक्ती आणि लहान मुलांना शक्यतो बाहेर पाठवू नका, असे प्रशासनाने म्हटले आहे. या धुरामुळे न्यूयॉर्कमध्ये वाहतुकीवरही परिणाम झाला असून द़ृश्यमानता कमी झाली आहे. आगामी काळात विमानसेवेवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Back to top button