प्रसिद्ध आडतदार संपत (आप्पा) निंबाळकर यांचे निधन | पुढारी

प्रसिद्ध आडतदार संपत (आप्पा) निंबाळकर यांचे निधन

केडगाव; पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक आणि केडगाव येथील प्रसिद्ध आडतदार संपत (आप्पा) बबनराव निंबाळकर यांचे हृदयविकाराने निधन झाले. सोमवारी (दि. १५) रात्री साडेबारा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. त्याच्या पश्यात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

केडगावचे प्रसिद्ध आडतदार म्हणून परिचित असणारे निंबाळकर गेली १० वर्ष संचालक होते तसेच त्यांनी उपसभापतीपद सुद्धा भूषवलेले आहे. नुकत्याच २८ एप्रिल रोजी झालेल्या मतदानामध्ये ते व्यापारी मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. त्यांच्या निधनाने केडगाव पंचक्रोशीत मोठा धक्का बसला असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button