Incovac vaccination : ६० वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरु | पुढारी

Incovac vaccination : ६० वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरु

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईसह देशभरात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणेने लसीकरण मोहीम हाती घेतली असून, शुक्रवारपासून इन्कोव्हॅक ही लस ६० वर्षावरील नागरिकांना प्रतिबंधात्मक मात्रा म्हणून देणे सुरू केले.

मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु झाली. सुरुवातीला प्राधान्य गटांचे व त्यानंतर १ मे पासून १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यात आले होते. बूस्टर डोस १० जानेवारी २०२२ पासून सुरू झाला. २६ एप्रिलपर्यंत मुंबईत कोविड प्रतिबंधक लसीची पहिली, दुसरी आणि प्रतिबंधात्मक मात्रा घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या २ कोटी २१ लाख ९६ हजार ९९५ इतकी आहे. पहिली मात्रा घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या १ कोटी ८ लाख ९३ हजार ६७९ तर, दुसरी मात्रा घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या ९८ लाख १५ हजार २० इतकी आहे. बूस्टर डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या १४ लाख ८८ हजार २९६ आहे.

Back to top button