…आता एकच WhatsApp अकाऊंट वापरता येणार वेगवेगळ्या मोबाईलमध्ये : जाणून घ्या नवे फिचर | पुढारी

...आता एकच WhatsApp अकाऊंट वापरता येणार वेगवेगळ्या मोबाईलमध्ये : जाणून घ्या नवे फिचर

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियामध्ये आज सर्वात लोकप्रिय कोणतं माध्यम असेल तर ते म्हणजे WhatsApp. त्‍यामुळे दिवसेंदिवस फेसबुकची मालकी असलेले WhatsApp वापरणाऱ्यांच्या संख्‍येत लक्षणीय वाढ होत आहे. आपल्या युझर्सना वापरण्यात सुलभता येण्यासाठी WhatsApp नवनवीन हटके आणि धमाकेदार फिचर आणत असते. आता या ॲपने आणखी एक नवे फिचर युझर्ससाठी आणले आहे. हे फिचर म्हणजे युझरला एकच व्हॉट्सॲप अकाऊंट इतर फोनमध्ये वापरता येणार आहे. जाणून घेऊया या नवीन फिचरविषयी…

वापरकर्त्यांना एकापेक्षा अधिक फोनवर एकच खाते वापरण्याची परवानगी देणारे हे WhatsAppचे नवे फिचर आहे. यामध्ये एक प्राथमिक म्हणजेच मुख्य खाते असणारे पहिले उपकरण किंवा मोबाईल महत्त्वाचे असणार आहे. या पहिल्या मोबाईलमधून हे फिचर ऑपरेट करता येणार आहे. या पहिल्या फोनमधील खात्याला लिंक केलेला प्रत्येक फोन व्हॉट्सअॅपशी स्वतंत्रपणे कनेक्ट होतो. संदेश, मीडिया आणि कॉल्स हे सर्व काही एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड (सुरक्षित) असल्याची खात्री देखील हे नवे फिचर देणार आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

वापरकर्त्याच्या मुख्य पहिल्या उपकरणामध्ये (मोबाईल) हे खाते दीर्घ काळ निष्क्रिय असेल, तर (WhatsApp) कनेक्ट केलेले खाते इतर सर्व उपकरणांमधून स्वयंचलितपणे लॉग आउट केले जाईल. इन्स्टंट मेसेजिंग नुसार, वेगवेगळे डिव्हाइसेस लिंक केल्याने वापरकर्त्यासाठी मेसेजिंग करणे सुलभता येते. या नव्या फिचरमुळे आता व्हॉट्सअॅपच्या वापरामध्ये भरपूर बदल झालेले पहायला मिळतील. तसेच याचा फायदा अनेक लोकांशी संवाद साधण्यासाठी आणखी बदल करेल.

हेही वाचा

Back to top button