Wrestlers Plea Filed: कुस्तीपट्टूंच्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल; पोलिसांना बजावली नोटीस

सर्वोच्च न्यायालय:
सर्वोच्च न्यायालय:
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात यावा, अशी मागणी विनेश फोगटसह अन्‍य सात कुस्तीपटूंनी (Wrestlers Plea Filed) केली होती. या प्रकरणी कारवाईसाठी त्‍यांनी दिल्‍लीतील जंतरमंतरवर आंदोलनही सुरू केले होते. दरम्यान, कुस्तीपट्टूंच्‍या याचिकेची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. यावर शुक्रवारी (दि.२८) सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

सिंग यांच्याविरोधात वारंवार तक्रार करुनही त्याची दखल घेण्यास पोलिस तयार नाहीत. असे याचिकाकर्त्या कुस्तीपटूंकडून न्यायालयाला सांगण्यात आले. दरम्यान न्यायालयाने ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी करणाऱ्या सात कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या याचिकेशी संबंधित प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून यादी (Wrestlers Plea Filed) करण्यात आली आहे. तसेच महिला कुस्तीपटूंची ओळख सार्वजनिक होऊ नये, यासाठी त्यांची नावे न्यायालयीन रेकाॅर्डमधून हटविली जावीत, असे निर्देश देखील खंडपीठाने दिले आहेत. याप्रकरणी शुक्रवार, २८  एप्रिलला सुनावणी घेतली जाईल; असे देखील न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा गंभीर आरोप करण्‍यात आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत सात तक्रारी आल्या असून, यासंदर्भात चौकशी सुरु आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जर कोणता राजकीय पक्ष समोर येत असेल तर त्याचे आम्ही स्वागत करतो, असे कुस्तीपटूंकडून सांगण्यात आलेले आहे. आम आदमी पक्षाचे खासदार डाॅ. सुशील गुप्ता यांनी बृजभूषण सिंग यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी दिल्ली पोलिसांकडे केली आहे.

दरम्यान तपासाचा भाग म्हणून क्रीडा मंत्रालयाकडून स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल मागविण्यात आला आहे, असे दिल्ली पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. सिंह यांच्याविरोधात ठोस पुरावे आढळले की, त्यांच्यावर गुन्हा दाखल (Wrestlers Plea Filed) केला जाईल; असेही अधिकाऱ्यांनी स्‍पष्‍ट केले होते.

कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांच्यासह इतर कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाईसाठी रविवारपासून जंतरमंतरवर धरणे आंदोलन सुरु केले आहे. "आम्ही कोणत्याही राजकीय पक्षांची संबंध नाही. यावेळी भाजप, काँग्रेस, आप किंवा अन्य कोणताही पक्ष असो आमच्यात सहभागी होणाऱ्या सर्व पक्षांचे स्वागत आहे" असे बजरंग पुनिया याने म्हटले होते.

जंतर-मंतरवर कुस्‍तीपटूंनी १८ जानेवारी २०२३ रोजी आंदोलन केले होते. त्‍यांनी ब्रिजभूषण शरण सिंह आणि महासंघावर लैंगिक शोषण, मानसिक छळ, जीवे मारण्याच्या धमक्या आणि आर्थिक गैरव्यवहार यासह विविध आरोप केले होते. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने हस्तक्षेप केला आणि कुस्तीपटूंच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी आणि WFI च्या दैनंदिन कामकाजाचा ताबा घेण्यासाठी एक तपास समिती स्थापन केली होती. पर्यवेक्षण समिती स्थापन करण्याआधी सरकारने त्यांच्याशी सल्लामसलत केली नाही, असाही दावा त्‍यानी केला होता.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news