Share Market Closing Bell – निर्देशांक वधारले, सेन्सेक्स, निफ्टी दोन्ही ग्रीनमध्ये | पुढारी

Share Market Closing Bell - निर्देशांक वधारले, सेन्सेक्स, निफ्टी दोन्ही ग्रीनमध्ये

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेअर बाजारासाठी मंगळवार हा सकारात्मक गेला. बाजारात फार मोठ्या हालचाली झाल्या नसल्या तरी सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक मंगळवारी वधारले होते. सेनसेक्स ०.१२ टक्केंनी वधारून ६०,१३०.७१ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 0.15 टक्केंनी वधारत 17,769.25 अंकावर बंद झाला.

शेअर बाजाराची सकाळची सुरुवात सावध अशी झाली. सुरुवातीच्या सत्रात दोन्ही निर्देशंकात किरकोळ घसरण झाली होती. NSEचा निफ्टी ५० हा निर्देशांक सकाळी ८.९५ अंकानी खाली येत १७.७३४.४५ वर आला होता. तर सेनसेक्स १३.८६ अंकांनी खाली येत ६००४२.२४ अंकावर आला होता. बँक निफ्टी आणि निफ्टी फार्मा या दोन्ही निर्देशंकांना आज फटका बसला.

टॉप गेनर्स

आजच्या सत्रात इंडसइंड बँक, बजाज अॅटो, हिरो मोटोकॉर्प, बजाज फिनसर्व्हिस, जेएसडब्लू स्टील हे टॉप गेनर्स ठरले.

टॉप लुजर्स

आजच्या सत्रात युपीएल, टेक महिंद्रा, एचडीएफसी लाईफ, कोटक बँक आणि टीसीएस हे टॉप लुजर्सच्या यादीत राहिले.

Back to top button