wheatgrass juice : मधुमेह, हृदयविकारावर ‘व्हीटग्रास’ ठरू शकते गुणकारी | पुढारी

wheatgrass juice : मधुमेह, हृदयविकारावर ‘व्हीटग्रास’ ठरू शकते गुणकारी

नवी दिल्ली : मधुमेह, हृदयविकार यासारख्या आजारांवर गुणकारी ठरणार्‍या पदार्थांचा नेहमीच शोध घेतला जात असतो. ‘व्हीटग्रास’ यासाठी गुणकारी ठरू शकते असे दिसून आले आहे. ‘व्हीटग्रास’ म्हणजे गव्हाची पात, आपण ते घरामध्ये किंवा बाहेर दोन्ही ठिकाणी वाढवू शकता. गव्हाच्या बिया कुठेही ओलसर ठिकाणी ठेवल्या तर काही दिवसांनी त्यात प्रत्येक पानं येऊ लागतात, ज्याला ‘व्हीटग्रास’ म्हणतात.

यामध्ये क्लोरोफिल किंवा हरितद्रव्य असते, त्यामुळे या वनस्पतीला हिरवा रंग येतो. त्याच्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते. व्हीटग्रासची हिरवी पाने हे व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सेलेनियम यासारख्या खनिजे आणि जीवनसत्त्वांचे ‘पॉवरहाऊस’ आहे.‘एनसीबीआय’मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार लिपिड आणि ग्लुकोजची पातळी वाढवण्यासाठी व्हीटग्रास खूप प्रभावी आहे. ज्यामुळे मधुमेह नियंत्रित करण्यास मदत होते.

या सुपरफूडमध्ये असलेल्या मॅग्नेशियममुळे रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते. त्याचे अँटिऑक्सिडंट गुणधर्म मुक्त रॅडिकल पेशींच्या नुकसानाशी लढण्यास मदत करतात, जे मधुमेहामुळे वाढतात. टाईप-2 मधुमेहामुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉल किंवा एलडीएलचे प्रमाण वाढू शकते. चांगले कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते. एका अभ्यासानुसार, गव्हाच्या पातीच्या रसाने यावर नियंत्रण ठेवता येते. गव्हाच्या पातीच्या रसाचे सेवन केल्याने एलडीएल कमी होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

Back to top button