सांगली : चोरीची बोगस चौकशी करणार्‍यांची चौकशी | पुढारी

सांगली : चोरीची बोगस चौकशी करणार्‍यांची चौकशी

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : आटपाडी तालुक्यातील बेकायदा वाळू चोरीच्या चौकशीची आणि या चोरीचा तपास करताना बोगस चौकशी करणार्‍यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ही माहिती रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी दिली.

खरात यांनी तालुक्यात वाळूचोरी चौकशीतील मनमानीबाबत शिंदे यांना मंगळवारी निवेदन दिले होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, राजेंद्र खरात यांनी शिंदे यांच्याशी चर्चा केली.

खरात म्हणाले, आपण तहसीलदार बी. एस. माने यांच्या कार्यक्षेत्रात आणि कारकीर्दीत मोठ्या प्रमाणात वाळू चोरी झाली आणि आजही सुरू आहे. याबाबत तक्रारी केल्या आहेत. यानंतर शिराळा तहसीलदार गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ऑगस्ट महिन्यात पंचनामे केले आणि अहवाल दिला असल्याचे सांगितले. परंतु वस्तुस्थितीला धरून पंचनामा केला नाही. तहसीलदार माने आणि बोगस पंचनामे करणारे पथकावर कारवाई करावी, अशी मागणी राजेंद्र खरात यांनी केली. आमदार पडळकर यांनी कारवाई करावी, अशी मागणी केली. यावर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Back to top button